महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाशिक शहरात फिरवून बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाशिक शहरात फिरवून बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

Read More

विरोधकांच्या निष्क्रियतेला कंटाळून मढी बुद्रुक येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील मढी बुद्रुक येथील काळे गटाचे माजी उपसरपंच सिताराम आप्पा गवळी व शिवाजी अण्णा निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटात प्रवेश केला त्याबद्दल त्यांचा सौ. स्नेहलता कोल्हे यांनी सत्कार केला.मढी बुद्रुक येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील दिलीपराव कारभारी गवळी व अध्यक्ष नानासाहेब कारभारी गवळी आदी या पसंगी उपस्थित होते. प्रारंभी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम […]

Read More

लखीमपुरच्या घटनेतील आरोपींना कठोर शासन करा; कोपरगावात व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला केंद्र सरकारचा निषेध…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- उत्तर प्रदेशातील लखीमपुर मध्ये शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना (बळीराजाला) केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने चिरडून ठार मारले असून यामध्ये चार शेतकऱ्यांसह इतरही चार नागरिक असे एकूण आठ नागरिक मारले गेले असून जगाच्या पोशिंद्याला अशा प्रकारे ठार मारण्याच्या अमानुष्य घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. त्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सोमवार (दि.११) […]

Read More

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करा; आ. आशुतोष काळेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील काही दिवसांपासून कोपरगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे महसूल विभागाकडून बहुतांश पंचनामे करण्यात आले असून पंचनामा करण्याच्या प्रक्रिया अजूनही मतदार संघात सुरु आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले असून त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.११ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २०५२९२ झाल्या असुन १४६३० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४३०९ आहे तर उपचार सुरू असलेले ९९ आहे व मयत झालेले २२२ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.११ ऑक्टोबर २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ७४२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निधीतून व नगराध्यक्ष यांच्या प्रयत्नातून कोपरगाव शहरातील रस्त्यांच्या कामांना होणार प्रारंभ:- विरेन बोरावके…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विविध विकास कामांसाठी आजपर्यंत कोरोनाच्या संकटात देखील १२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यांनी रस्त्यासाठी दिलेल्या निधीतून व नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार असून मागील अनेक वर्षापासून खराब रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या […]

Read More

उद्याचा महाराष्ट्र बंदमध्ये कोपरगावचे व्यापारी काळ्या फिती लावून करणार केंद्र सरकारचा निषेध…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्यामुळे शेतकऱ्यांचा आवाज बंद करू पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने सोमवार (दि.११) रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. परंतु कोपरगाव शहरात बंद न पाळता कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, शिवसेनेचे […]

Read More

कोरोना काळ व लॉकडाऊन- त्याचे दुष्परिणाम:- साईसेवक गणेशजी दळवी…

कोपरगाव प्रतिनिधी:-लोणी परिसरात बेवारस 32 वर्षांचा मनोरुग्ण युवक फिरत असतांना लोणी पोलिसांना सापडला तेव्हां त्याला काही सांगता येत नव्हते अशावेळी लोणी पोलिस्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.समाधान पाटील साहेब व पोलीस अनिस सय्यद यांनी साईआश्रयात दाखल केले त्यानंतर नातेवाईकांचा शोध घेण्यात आला तेव्हां धुळे येथील आई शोभाबाई छगन सोनार यांचा संपर्क झाला तेव्हां ते साईआश्रयात घेण्यासाठी पोहचले […]

Read More

कोपरगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडीची कार्यकारिणी जाहीर; ‘अध्यक्ष पदी कारवाडीचे प्रशांत खडतकर तर सचिव पदी पोहेगांव येथिल देविदास झाल्टे’…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघ व कोपरगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी चा मेळावा कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय,कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्याला माध्यमिक शिक्षक संघ कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री.विलासराव वाकचौरे,सचिव श्री. नरेंद्र ठाकरे,टीडीएफ मावळते तालुकाध्यक्ष श्री.कर्णासाहेब शिंदे,सचिव श्री.कैलास थोरात,तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.सुरेशराव बोळीज,जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष श्री.गजानन शेटे,श्री.साहेबराव […]

Read More

कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील श्री.संत नरहरी महाराज विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी समस्त सुवर्णकार समाजाचा मेळावा घेण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील श्री.संत नरहरी महाराज विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी समस्त सुवर्णकार समाजाचा मेळावा घेण्यात आला. सदर मेळाव्यात कोपरगाव नगर परिषदेमार्फत १०,००,००० /- रुपये वैशिष्ट्यपुर्ण योजने अंतर्गत निधी जाहीर केलेले असतांना त्यात आणखी *प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक सौ.एेश्वर्यलक्ष्मी संजयराव सातभाई व श्री.योगेश तुळशीदास बागुल यांच्या प्रयत्नाने मंदिरासाठी ५,००,०००/- रुपये […]

Read More