विरोधकांच्या निष्क्रियतेला कंटाळून मढी बुद्रुक येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील मढी बुद्रुक येथील काळे गटाचे माजी उपसरपंच सिताराम आप्पा गवळी व शिवाजी अण्णा निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटात प्रवेश केला त्याबद्दल त्यांचा सौ. स्नेहलता कोल्हे यांनी सत्कार केला.
मढी बुद्रुक येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील दिलीपराव कारभारी गवळी व अध्यक्ष नानासाहेब कारभारी गवळी आदी या पसंगी उपस्थित होते. प्रारंभी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम यांनी प्रास्ताविक केले. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे म्हणाले की, मतदार संघात विरोधकांनी निवडणूक जिंकण्यासाठी खोटी आश्वासने दिली. आता त्यांच्याच कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहेत.
सौ. स्नेहलता कोल्हे याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तळागाळातील वंचित घटकांच्या समस्या जाणून घेत त्यावर प्रभावी उपाय योजना केल्या आहेत.
यावेळी कोपरगाव तालुका भाजपा युवा मोर्चा चे उपाध्यक्ष अमोल दिलीपराव गवळी तसेच भाजप ओबीसी जिल्हा कार्यकारणी सदस्य रवींद्र डहाळे, ग्रामपंचायत सदस्य भगवान मोकळ, गणपत गुंजाळ, काकासाहेब पवार, बद्रीनाथ गवळी, कैलास गवळी, संपत गवळी, संतोष गवळी, महेश चव्हाण, अनिल गवळी, कृष्णकांत गवळी, मुकुंद गवळी, किशोर खैरनार, संजय गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी नानासाहेब गवळी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *