
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील श्री.संत नरहरी महाराज विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी समस्त सुवर्णकार समाजाचा मेळावा घेण्यात आला.


सदर मेळाव्यात कोपरगाव नगर परिषदेमार्फत १०,००,००० /- रुपये वैशिष्ट्यपुर्ण योजने अंतर्गत निधी जाहीर केलेले असतांना त्यात आणखी *प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक सौ.एेश्वर्यलक्ष्मी संजयराव सातभाई व श्री.योगेश तुळशीदास बागुल यांच्या प्रयत्नाने मंदिरासाठी ५,००,०००/- रुपये निधी मंजूर करण्यात आला असे जाहीर करण्यात आले याप्रसंगी श्री.नागरे गुरुजी,कृष्णाशेठ उदावंत,नंदुशेठ विसपुते,अनिलभाऊ जाधव,भाऊसाहेबजी बागुल,लाड सुवर्णकार समाजाचे,अध्यक्ष.प्रकाशशेठ भडकवाडे,नंदुशेठ निकुंभ,दत्तुशेठ निकुंभ,विनायकजी बाविस्कर,सुरेशशेठ भडकवाडे, विजुशेठ भडकवाडे,शिवाजीशेठ देवकर,चंदुकाका बावीस्कर,अशोकभाऊ दुसाने, अरुणजी बागुल,अरुणशेठ उदावंत,दिपकशेठ विसपुते,संजयशेठ उदावंत,दत्तात्रयजी उदावंत,अनिलजी दाभाडे,रमेशशेठ उदावंत,नंदुभाऊ देवळालीकर,अविनाशजी बागुल,बाळासाहेब नेवसे,संतोषभाऊ देवळालीकर,संजय मंडलिक, उल्हासजी नागरे,नितीन भडकवाडे,अक्षयजी भडकवाडे,रणजित भडकवाडे, संजयजी भडकवाडे,अनिकेतजी भडकवाडे,विनोदजी मोरस्कर,नवनाथ उदावंत,बंटीभाऊ सोनवणे,तेजस देवाळीकर,पप्पु सातभाई आशिष निकुंभ,कुणाल लोणारी,शुभम भावसार,निखील जोशी,बंटी गोसावी,हेमंत गोसावी उपस्थित होते.



याप्रसंगी *श्री.संजयराव सातभाई व योगेशजी बागुल यांना मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी जाहिर केल्याबद्दल त्यांचा समस्त सुवर्णकार समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देतांना संजयजी सातभाई व योगेशजी बागुल यांनी आपले मनोगत व्यक्त केले व उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजुशेठ भडकवाडे व आभार संजयभाऊ मंडलिक यांनी मानले यावेळी सराफ बाजार परिसरातील प्रतिष्ठीत व्यापारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
