कोरोना काळ व लॉकडाऊन- त्याचे दुष्परिणाम:- साईसेवक गणेशजी दळवी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
लोणी परिसरात बेवारस 32 वर्षांचा मनोरुग्ण युवक फिरत असतांना लोणी पोलिसांना सापडला तेव्हां त्याला काही सांगता येत नव्हते अशावेळी लोणी पोलिस्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.समाधान पाटील साहेब व पोलीस अनिस सय्यद यांनी साईआश्रयात दाखल केले त्यानंतर नातेवाईकांचा शोध घेण्यात आला तेव्हां धुळे येथील आई शोभाबाई छगन सोनार यांचा संपर्क झाला तेव्हां ते साईआश्रयात घेण्यासाठी पोहचले तेव्हां त्यांनी सांगितले गेल्या 1 वर्षा पासून हा बेपत्ता होता हा पुणे येथे कामाला गेला होता परंतु लॉकडाऊन मुळे काम बंद झाले त्यामुळे याला खूप मानसिक त्रास झाला काय करावे कुठे राहावे काय खावे घरी आई ला कसे पैसे पाठवावे या विचारामुळे तो मनोरुग्ण झाला व आमचा त्याचा संपर्क तुटला खूप शोधले सापडला नाही

या लॉकडाऊन मुळे आमची खूप हाल झाली बरे झाले हा कमीत कमी तुमच्या मुळे भेटला तरी नाहीतर याचे काय झाले असते त्या युवकाने ही आईला ओळखले व खूप रडायला लागला अशाप्रकारे त्या बेवारस युवकाला त्याची आई मिळाली कायदेशीर पूर्तता करून त्याला ताब्यात देण्यात आले अशा अनेक दुर्दैवी घटना या 2 वर्षात कोरोना काळात घडल्या आहेत यातून सावरण्यासाठी साईबाबांनि अशा सर्वांना शक्ति व चांगले आरोग्य देवो अशी साई चरणी प्रार्थना
ओम साई राम
साई सेवक – गणेश दळवी
Mo – 9637549300

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *