कोपरगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडीची कार्यकारिणी जाहीर; ‘अध्यक्ष पदी कारवाडीचे प्रशांत खडतकर तर सचिव पदी पोहेगांव येथिल देविदास झाल्टे’…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघ व कोपरगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी चा मेळावा कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय,कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्याला माध्यमिक शिक्षक संघ कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री.विलासराव वाकचौरे,सचिव श्री. नरेंद्र ठाकरे,टीडीएफ मावळते तालुकाध्यक्ष श्री.कर्णासाहेब शिंदे,सचिव श्री.कैलास थोरात,तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.सुरेशराव बोळीज,जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष श्री.गजानन शेटे,श्री.साहेबराव गायकवाड, श्री.भास्कर बांगर,श्री.काशिनाथ लव्हाटे,श्री.दिलीप डहाळे ,राहाता टीडीएफ चे नुतन उपाध्यक्ष सुरेश वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री. मकरंद कोऱ्हाळकर यांनी निरिक्षक म्हणून काम पाहिले.
कोपरगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ)ची कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली ती पुढील प्रमाणे जाहिर करण्यात आली.
तालुका अध्यक्ष म्हणून श्री. प्रशांत खडतकर
उपाध्यक्ष श्री.शिवाजी जुंधारे व श्री.कुलदीप गोसावी
सचिव श्री.देविदास झाल्टे,
सहकार्यवाहक श्री.ललित जगताप व श्री.गोविंद गोरे
खजिनदार श्री.राहुल गिते
या सर्वाच्या निवडी एकमताने करण्यात आल्या..हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अहमदनगर जिल्हा माध्य.शिक्षक संघाचे जिल्हा प्रतिनिधी श्री.रामदास गायकवाड व श्री.अनिल अमृतकर,ए.जे.कोताडे यांनी परिश्रम घेतले.नवनिर्वाचित कार्यकारिणीचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.आभार माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव श्री.नरेंद्र ठाकरे तर कार्यक्रम सुत्र संचलन श्री.रामदास गायकवाड यांनी केले.या मेळाव्याला तालुक्यातुन बहुसंख्य शिक्षक कोरोनाचे नियम पाळुन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *