
कोपरगाव प्रतिनिधी:-
११ ऑगस्ट सलून डे तसेच आपला भारत देश येत्या १५ ऑगस्ट रोजी ७५ वा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. याचेच औचित्य साधून संगमनेर तालुका नाभिक एकता महासंघ संलग्न नाभिक महामंडळ, सलून असोसिएशनच्या वतीने संगमनेर तालुका ग्रामीण विभाग सलूनचे भाववाढी दरपत्रकाचे अनावरण करण्यात आले. संगमनेर येथील प्रसिद्ध उद्योजक व साईराज ट्रेडर्स कंपनीचे मालक प्रो.प्रा.महेशजी राजपाल यांच्या सौजन्याने दरपत्रकाची छपाई करण्यात आली. या दरपत्रकाच्या वितरण सोहळा सामाजिक कार्यकर्ते श्री सुनिलभाऊ उकिरडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वितरण समारंभाला नाभिक एकता महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री किरणभाऊ बिडवे, अहमदनगर जिल्हा नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष साईभक्त श्री मनोजभाऊ वाघ, अहमदनगर जिल्हा सलून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ बिडवे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. यावेळी नाभिक एकता महासंघाचे प्रवक्ते श्री किरणभाऊ मदने, संगमनेर तालुका नाभिक महासंघाचे तालुकाध्यक्ष साईभक्त किशोरभाऊ बिडवे सर, सलून असोसिएशन संगमनेर तालुकाध्यक्ष श्री बाळासाहेब वाघ, संगमनेर तालुका नाभिक एकता संघाचे उपाध्यक्ष श्री संजयभाऊ जाधव, युवानेते कार्याध्यक्ष श्री गणेशभाऊ बिडवे, सरचिटणीस श्री रविभाऊ भराडे यांच्या सह समाजातील अनेक मान्यवर सोहळ्यासाठी उपस्थित होते. तसेच नाभिक महासंघाला दर पत्रक उपलब्ध करून देणारे साईराज ट्रेडर्सचे प्रो.प्रा.महेशजी राजपाल यांचे महासंघाच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी शाल व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. सलूनचे जाहीर केलेले नवीन दरपत्रकाची आकारणी श्री संतसेना पुण्यतिथीच्या दिवशी २४ तारखेला लागू करण्यात येणार असल्याचे संगमनेर तालुकाध्यक्ष श्री बाळासाहेब वाघ यांनी सांगितले. तसेच दरपत्रक हे संगमनेर तालुक्यातील नाभिक बांधवांसाठी मोफत उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे नाभिक एकता महासंघाचे तालुकाध्यक्ष साईभक्त श्री किशोरभाऊ यांनी सांगितले व शेवटी उपस्थितांचे मनापासून आभार मानले.
