बालवयात स्वच्छतेच्या सवय अंगिकारा:- गटशिक्षणाधिकारी पिंकी वाजे…

कोपरगाव प्रतिनिधी:-
स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता महत्वाची असून बालवयात स्वच्छतेच्या सवयी अंगिकारा. असे आवाहन गटशिक्षणाधिकारी पिंकी वाजे यांनी एका कार्यक्रमात केले.
केंद्रीय संचार ब्यूरो, अहिल्यानगर आणि सूर्यतेज संस्था, कोपरगांव वतीने “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होण्यासाठी स्वच्छता आठवडा (दि. २४ सप्टेंबर २०२६ ते दि.२ ऑक्टोबर २०२६) या कालावधीत “स्वच्छ ही सेवा” या उपक्रमाचे आयोजन सेवानिकेतन काॅन्व्हेंट स्कूल कोपरगांव येथे करण्यात आले होते .
“स्वच्छ ही सेवा २०२६” उपक्रमात चित्रकला स्पर्धा, कृतीशील उपक्रम आणि जनजागृती उपक्रमात सेवानिकेतन काॅन्व्हेंट स्कूल कोपरगांव येथील स्काऊट आणि गाईडचे विद्यार्थ्या सहभागी बक्षिस विजेते यांचे पारितोषिक वितरण आणि अभियानाचा समारोप करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्या गटशिक्षणाधिकारी पिंकी वाजे, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, शाळेच्या व्यवस्थापक मेरी करवालो, मुख्याध्यापिका सोनिया लोपीस, मुख्याध्यापिका (प्राथमिक) प्रमिला, शिक्षक शिवाजी जाधव, प्रतिभा साळुंके, मनिषा बिरुटे, जमील खान आदींसह सर्व शिक्षक विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
स्वच्छता ही सेवा – २०२६ उपक्रमात स्वच्छता प्राथमिक प्रशिक्षण, वैयक्तिक स्वच्छता आणि शाळेतील सर्व वर्गातील मुलांना वैयक्तिक स्वच्छतेबाबत प्रबोधन, श्री गणेशोत्सवाचे निर्मला संकलन आणि आपापले घर आणि परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती, चित्रकला स्पर्धा (विषय : स्वच्छ भारत अभियान आणि पर्यावरण), आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता करणे, शालेय परिसर स्वच्छता अभियान, प्रशासकीय कार्याला भेट देऊन स्वच्छतेविषयी जनजागृती करणे, शालेय परिसरात वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन, महात्मा गांधी आणि संत गाडगेबाबा यांच्या विषयी पुस्तक वाचन करणे अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
चित्रकला स्पर्धेतील बक्षिस विजेते गट -अ (५ वी ते ७ वी) प्रथम – समृद्धी महेश दरेकर, व्दितीय – राजकन्या दिपक पगारे, तृतीय – अनुष्का विनोद डामरे गट ब (८ वी ते १० वी) प्रथम- उन्नती राजेंद्र खंडीझोड, द्वितीय – जिया अन्वर शेख, तृतीय- सरिना इसाक शेख, उत्तेजनार्थ – अक्सा मोसीन सय्यद यांना सन्मानचिन्ह, भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. तसेच अभियान यशस्वीतेसाठी प्रभावशाली काम करणाऱ्या पुर्वी अनिकेत शिंदे, लावण्या दादासाहेब गुरसळ, अमायरा करीम शेख, प्रसन्ना जगदीश आदमाने, असद अजिज शेख, प्रद्युम्न दीपक दवंगे, या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. स्नेहवस्र आणि रोप देवून उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिभा साळुंके यांनी तर सुत्रसंचालन उन्नती खंडिझोड, श्रृती रोहमारे यांनी आभार अमायरा शेख यांनी मानले.अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे सामाजिक कार्याला उजाळा देवून श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी स्काऊट आणि गाईडचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी प्रयत्न केले.
