संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम च्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोपरगावात केली जनजागृती…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्या निमित्त संपूर्ण देशभरात हा स्वातंत्र्य दिवस “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” म्हणून साजरा करण्याचे योजिले आहे. या महोत्सवानिमित्त संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये चित्रकला, वकृत्व, रांगोळी स्पर्धा व घोष वाक्य बनवा अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांनी कोपरगाव नगरीत प्रभात फेरी काढून जनजागृती केली. प्रभातफेरी वेळी विद्यार्थी व शिक्षकांनी “भारत माता की जय”,”वंदे मातरम” व “हर घर तिरंगा” आशा देशभक्ती पर घोषणा देत या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी जनजागृती करण्यात आली. कोपरगावतील नागरिकांनी फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी विविध घोष वाक्य तयार करून प्रभात फेरी च्या माध्यमातून नागरिकांना त्यातून देशभक्तीचे संदेश दिले. विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. या वेळी संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे, प्राचार्य सचिन मोरे,उपशिक्षिका वैशाली लोखंडे, वसुधा झावरे,प्रियांका शेलार,प्रियांका फाटक्कर,पूनम सूर्यवंशी,अनुप गिरमे,सागर खटावकर,शिक्षकेत्तर कर्मचारी अक्षय नन्नावरे,रवींद्र पवार, चंद्रहंस पाबळे, सतिश लोळगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *