महात्मा फुले कृषि विद्यापीठात 18 अधिकारी व कर्मचारी झाले सेवानिवृत्त…

Uncategorized

सेवेत असतांना आपण किती विद्यार्थ्यांच्या आणि शेतकर्यांच्या जीवनात प्रकाश आणला ते महत्वाचे:- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
नोकरीत असतांना आपण काम करत राहिले पाहिजे. आपल्या सोबत असते फक्त आपण केलेले चांगले काम, त्या पाठीमागची प्रामाणीक भावना, मिळालेला आनंद व समाधान. आपण सेवेत असतांना आपल्या कामामुळे किती विद्यार्थ्यांच्या व शेतकर्यांच्या जीवनात प्रकाश आणला आहे हे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सत्कार व सेवानिवृत्त विषयक लाभ देण्यासाठी तसेच 12/24 वर्षाच्या आश्वासीत प्रगती योजनेचे लाभ देण्यासाठी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. श्रीमंत रणपिसे, हैद्राबाद येथील जलव्यवस्थापन व निचरा विभागाच्या आंतरराष्ट्रीय आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. ए. येल्ला रेड्डी, कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक श्री. सदाशीव पाटील, सौ. गोरंटीवार मॅडम व सौ. रणपिसे मॅडम उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील पुढे म्हणाले की कर्मचार्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्व सेवानिवृत्तीचे लाभ दिले तर ही त्यांच्या कामाची पोहोच पावती होईल व कर्मचारी आनंदाने सेवानिवृत्ती होतील. आपल्या विद्यापीठाचे नांव हे विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांच्या योगदानामुळे आहे. विद्यापीठाने आठ महत्वाच्या पिकांमध्ये राज्याच्या अर्थकारणात 2,40,000 कोटी रकमेचे योगदान दिले आहे. विद्यापीठाचे योगदान पैशात न मोजण्यासारखे आहे. डॉ. गोरंटीवार यांच्याबद्दल बोलतांना कुलगुरु म्हणाले अतिशय कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, कामावरील निष्ठा, सकारात्मकता, नवे विचार निर्माण करण्याची क्षमता असणारे हे व्यक्तिमत्व आहे. डॉ. रणपिसे यांच्याबद्दल म्हणाले अतिशय नम्र, कार्यकुशल व आपल्या कर्मचार्यांच्या पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्व आहे. कुलगुरुंनी इतरही सेवानिवृत्त होणार्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या राहुरी, पुणे, कोल्हापूर व सोलापूर या चार विभागातील 18 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणारे डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. अतुल अत्रे, डॉ. भिमराज नजन व इतर कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कुलसचिव श्री. अरुण आनंदकर यांच्या कार्यतत्पतेमुळे सेवानिवृत्त होणार्या या अधिकारी व कर्मचार्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्तीविषयक लाभ अदा करण्यात आले. यावेळी प्रातेनिधीक स्वरुपात पाच कर्मचार्यांना 12/24 वर्षाच्या आश्वासीत प्रगती योजनेचे लाभाविषयीचे आदेश देण्यात आले. याच प्रकारचे 92 कर्मचार्यांचे आदेश निर्गमीत करण्यात आलेले आहेत. याप्रसंगी डॉ. विठ्ठल शिर्के, श्री. अरुण आनंदकर, डॉ. दिलीप पवार, श्री. सदाशीप पाटील, डॉ. साताप्पा खडबडे, डॉ. विजू अमोलिक, डॉ. महाविरसींग चौहान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. अतुल अत्रे व डॉ. भिमराज नजन यांनी यावेळी सत्काराला उत्तर देतांना आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी असोशिएशनच्या ई-बुलेटीनचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. संजय रुपनर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. विजय पाटील, श्री. सुनील आव्हाड, श्री. वसंत अडसूरे, श्री. बाळासाहेब पाटील, श्री. विनोद फुगारे, श्रीमती शैला पटेकर व श्रीमती शिल्पा चतारे यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *