कर्तव्यशून्य आ.काळे यांच्या पोकळ आश्वासनांचा फुगा आ.विवेक कोल्हे यांच्या धडाकेबाज नेतृत्वाने फुटला :- वैभव आढाव…

सुनील गंगूले म्हणजे स्वीकृतच्या गाजराचे भुकेले : कोल्हे गटाचा पलटवार…
कोपरगाव प्रतिनिधी:-
काहीतरी मिळेल या आशेने नेत्याला खुश करण्यासाठी धडपडणाऱ्या सुनील गंगूले यांच्यासारख्या लोकांना कर्तव्यशून्य असणाऱ्या आ.आशुतोष काळे यांच्या चार हजार कोटींचा फुगा धडाकेबाज नेते आ.विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रभावी कार्यशैलीने फुटल्याने काळे गटाचा कोल्हे कुटुंबाविरोधात जळफळाट सुरू असल्याचा जोरदार प्रहार भाजपा शहराध्यक्ष नगरसेवक वैभव आढाव यांनी केला आहे.
काळे यांनी आगामी काळात स्वीकृतचे चॉकलेट द्यावे म्हणून चर्चेत राहण्यासाठी गंगूले धडपडत आहेत.त्यांच्या नेतृत्वाचे चार हजार कोटींचे पितळ जनतेने उघडे पाडून त्यांना नगरपरिषद निवडणुकीत धूळ चारल्याने अद्यापही पराभवाची पोटदुखी ठसठस करत असल्याने स्नेहलताताई कोल्हे आणि आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्यावर टीका करून राजकीय पोट भरण्याचे काम काळे गटाच्या कार्यकर्त्यांना करावे लागते आहे.
कोल्हे कुटुंबाने केलेल्या कामाने तुमचे निष्क्रीय असल्याचे पाप टीका करून झाकू नका त्या पेक्षा प्रत्यक्ष तुम्ही काय दिवे लावले ते जनतेला दाखवा.हौस असेलच तर तुमच्या कारभाराचे नमुने जनतेला दाखवण्याची वेळ आणू नका अन्यथा गंगूले यांना चार चौघात बसणे कमीपणाचे वाटेल.समझने वाले को इशारा काफी. त्यामुळे जास्त खोडसाळपणे बोलण्यापेक्षा स्वतःच्या नेतृत्वाला आ.विवेकभैय्या कोल्हे यांच्यासारखे काम करण्यास सांगा असा उपरोधिक सल्लाही आढाव यांनी गंगूले यांना दिला आहे.
