“राष्ट्रीय चर्मकार महासंघाची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी जाहीर:- दिलीपराव कानडे…

Uncategorized

कोपरगाव श्रीरामपूर राहुरी नेवासा करीता- अशोकराव कानडे तर राहता संगमनेर अकोले साठी-राजाभाऊ खैरे यापुढे जिल्हाध्यक्ष…
कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना उपनेते माजी समाजकल्याण मंत्री बबनरावजी घोलपनाना यांचे अध्यक्षतेखाली अकोले येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जिल्हा मेळावा नुकताच संपन्न झाला
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात कोपरगाव श्रीरामपूर,राहता,राहुरी ,नेवासा,संगमनेर,अकोले या उत्तर जिल्ह्यातील कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असुन उर्वरीत पदाधिकारी नेमणुका लवकरच होणार असल्याचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष दिलीपराव कानडे यांनी सांगितले
माजी मंत्री बबनराव घोलप आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे प्रमुख उपस्थितीत हा मेळावा अकोले येथे संपन्न झाला
यावेळी अध्यक्ष पदावरून बोलत असतांना माजी मंत्री घोलप यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी मी राष्ट्रीय चर्मकार महासंघ या अराजकीय संघटनेची स्थापना केली असुन समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या संघटनेचे पदाधिकारी अविरतपणे वर्षानुवर्षे काम करत आहेत सर्वसामान्य समाज बांधवांचे जीवनमान उंचावण्या साठी माझे प्रयत्न सुरु असुन समाजातील तरुणांनी मागे न राहता पुढे येऊन उद्योग व्यवसाय उभारुन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा काही अडचणी आल्याच तर त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन माजी मंत्री बबनराव घोलप यांनी दिले
यावेळी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उपाध्यक्ष माजी आमदार कै अँड अवसरे यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव दत्तात्रय गोतिसे यांनी प्रास्ताविक केले
यावेळी तरुणांशी संवाद साधून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघ या संघटनेचे महत्त्व उपस्थित कार्यकर्त्यांना पटवून दिले व निवडीसाठी अर्ज मागविण्यात आले होते त्यावर प्रक्रिया राबविण्यात येऊन निवड समितीच्या शिफारशी नुसार नेवासा-श्रीरामपूर-कोपरगाव-
राहुरी करीता कोपरगाव तालुक्यातील वारी येथील माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे यांची तर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी शिलाताई देशमुख तसेच राहता-संगमनेर-अकोले करीता अकोले येथील राजाभाऊ खैरे तर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आशाताई केदारे यांच्या नावांची घोषणा माजी मंत्री बबनराव घोलप आणि आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केली
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे यांनी सर्व उपस्थितांचे विश्वास दाखविल्या बद्दल आभार मानून यापुढेही जिल्हाध्यक्ष म्हणून आजी माजी सर्व पदाधिकारी आशा सर्वांनाच बरोबर घेऊन काम करणार असल्याचे सांगत माजी मंत्री बबनराव घोलप यांची सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्ते सोबत घेऊन कार्य करण्याची शैली कौतुकास्पद असल्याचे सांगत सामान्य माणसात काम करणारे असामान्य व्यक्तिमत्त्व असल्याने समाज बांधवां बरोबरच देशभरातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते घोलप नानांचे चाहते असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सचिव नाशिक महानगरपालिका माजी उपायुक्त दत्तात्रय गोतिसे, उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीपराव कानडे,अँड संतोष कांबळे,राज्य उपाध्यक्ष अरुनराव गायित्रे,माजी नगराध्यक्ष राजेन्द्रजी वाकचौरे, राजेंद्र खैरे, तालुका अध्यक्ष भिमराव सोनवणे, शशिकांत थोरात, माधवराव पोटे, बाबासाहेब कांबळे, कैलासराव चिंधे, संजय पोटे,देविदास कानडे, संजय सरवार,गणेश कानडे अनिल कानडे तसेच महिला आघाडीच्या शोभाताई कानडे, मनीषाताई पोटे,शिलाताई देशमुख ,आशाताई केदारे आदींसह सर्व राष्ट्रीय,राज्य, जिल्ह्या,तालुका पदाधिकारी आणि अहमदनगर जिल्ह्यातील समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीते साठी भिमराव सोनवणे सर तसेच अकोले व संगमनेर येथील कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *