
कोपरगाव प्रतिनिधी:-
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४व्या जयंती सोहळ्या निमित्त कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संजीवनी उद्योग समुहाचे चेअरमन बिपीनदादा कोल्हे माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे कल्पनेतुन संजीवनी युवा प्रतिष्ठान टाकळी यांच्या माध्यमातुन उपसरपंच संजय भाऊ देवकर यांचे हस्ते गावातील सर्व शिक्षकांचा डायरी पेन देऊन सन्मान केला आहे.

याप्रसंगी टाकळी ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय भाऊ देवकर मा.सभापती सुनील भाऊ देवकर टाकळी सोसायटीचे चेअरमन रामदास पाटील देवकर माजी सरपंच सुनील पाईक किरण भाऊ देवकर बाळासाहेब नन्नवरे शरद पाईक सुनिल भिमराज देवकर सर्जेराव देवकर टाकळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका शेख मॅडम,सर्व शिक्षकवृंद यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शिक्षणाची गंगा लोकांपर्यंत पोहोचवणारे भगीरथ डॉ.कर्मविर भाऊराव पाटील यांनी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कमवा आणि शिका या योजनेतून गरिबांना शिक्षणाचा मार्ग दाखवला व समाजातील दिन -दुबळ्या समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवुन दिला आहे.
या पाश्र्वभुमीवर कोरोना काळातही शिक्षकांनी आपले ज्ञानदानाचे काम सुरू ठेवले याबद्दल संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे. अशी माहीती मा.सभापती सुनिल देवकर यांनी दिली आहे
