
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील राष्ट्रवादी काँग्रेस व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष दादा काळे यांना आज महाविकास आघाडी सरकारने राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्याबद्दल कोपरगाव शहरासह प्रभाग क्रमांक ५ मधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावठाण येथील अंबिका माता मंदिरा समोर भव्य अशी आतष बाजी करून व जेष्ठ नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या हस्ते देवी मातेच्या मंदिरात महाआरती करून आमदार आशुतोष दादा काळे यांना निरोगी आयुष्य व सर्व काम सांभाळण्यासाठी त्यांना मोठी शक्ती मिळो अशी प्रार्थना केली



यावेळी प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विकी जोशी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन माता रेणुका देवी ला साकडे घातले की आई माते आमचे लाडके आमदार आशुतोष दादा काळे यांना निरोगी आयुष्य मिळो व दिलेली जबाबदारी सांभाळण्याची शक्ती मिळो अशी देवीला मागणी केली यावेळी शेळके साहेब डॉ.समीर शाह अरुण गोसावी भालचंद्र गायकवाड (मंदिर पुजारी) विजय धाडीवाल संजय ठाकूर बाळासाहेब रुईकर मनोज नरोडे राहुल देवळालीकर धनंजय कहार गणेश लकारे विकी जोशी मुकुंद भुतडा दादा हलवाई अरुण जोशी संदीप देवळालीकर ऋषिकेश खैरनार राहुल आदमाने ओम दुसाने दीपक कराळे ओम बोराडे शुभम गायकवाड वामन गोसावी मुन्ना पठाण प्रताप गोसावी निखिल तांबे तन्मय गायकवाड अनिस शाह प्रसाद रुईकर श्याम मापारी रोहित खडांगळे नंदन वाघमारे योगेश जोशी (गुरु) फरदीन बेग संतोष ठाकूर श्रीकांत नरोडे अभिषेक गायकवाड व देवी मंदिराच्या पुजारी सौ उषाताई गायकवाड यांच्यासह प्रभाग क्रमांक ५ मधील अनेक युवक कार्यकर्ते तसेच जेष्ठ नागरिक यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सोशल डिस्टंसिंग चे पालन करत हजर होते.
