जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी नेमलेला अभ्यासगट मंत्रीमंडळाला आपला अहवाल सादर करणार:- छगन भुजबळ…

कोपरगाव

अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करावयाच्या लाभांबाबत गठीत केलेल्या अभ्यास गटाची आज पार पडली बैठक…


कोपरगाव प्रतिनिधी:-
अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रे आधारे सेवेत रूजू झालेल्या व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना अनुज्ञेय करावयाच्या सेवा व सेवा निवृत्ती विषयक लाभांबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेला अभ्यासगट हा आपला अहवाल लवकरच मंत्रीमंडळाला सादर करणार असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली.

     मंत्रालयातील परिषद सभागृहात, अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत रुजू झालेल्या व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी  व कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करावयाच्या सेवा व सेवा निवृत्ती विषयक लाभांबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी गठीत केलेल्या अभ्यास गटाची बैठक अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडावी,गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची दूरदृश्यप्रणालीव्दारे या बैठकीस उपस्थिती होती .बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *