
कोपरगाव प्रतिनिधी:-
छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शिवरत्न जिवा महाले यांची ख्याती संपूर्ण देशाला माहित आहे. शिवरत्न जीवा महाले यांचे योगदानची दखल स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पालखीचा मान दिला होता. त्यावेळी ही म्हणच सर्वांच्या मुखात होती “होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” आपणास विनंती की, आपण येणार्या ९ ऑक्टोबर रोजी शिवरत्न जिवा महाले जयंती शासनस्तरावर साजरी करण्याचे प्रशासनास आदेश दिल्यास आपण एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिल्याचा आनंद सर्व मावळ्यांना होईल.
तसेच प्रतापगडावर शिवरत्न जिवा महाले यांची महती नवीन पिढीला समजण्यासाठी त्यांचे स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आपण पुढाकार घेऊन सदरचा प्रश्न मार्गी लावावा.
सन्माननीय साहेब जवळ जवळ २ वर्षे लॉकडाऊन असल्याकारणाने आमच्या समाजावर उपासमारीची वेळ आली. अनेक समाज बांधवांनी आत्महत्या केल्या तरी आम्हाला शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत अथवा पॅकेज जाहीर झालेले नाही. पण साहेब शिवाजी शिवरत्न जिवा महाले यांची जयंती शासनस्तरावर व्हावी हा त्यांचा हक्कच आहे व हे महान कार्य आपल्याच कार्यकाळात पार पाडवे हीच अपेक्षा व नम्र विनंती

कळावे;
श्री किरणभाऊ बिडवे, कोपरगाव
(प्रदेश कार्याध्यक्ष, नाभिक एकता महासंघ)
श्री मनोजभाऊ वाघ, शिर्डी
(जिल्हा अध्यक्ष, नाभिक एकता महासंघ अहमदनगर जिल्हा)
व नाभिक समाज बांधव अहमदनगर जिल्हा
सुचना: प्रत्येक नाभिक बांधवांनी असे निवेदन व्हाट्सअप वर करण्यापेक्षा सोशल मीडिया म्हणजे ई-मेल, फेसबुक, ट्विटरवर आवाहन करा. जेणेकरुन संपूर्ण महाराष्ट्राभर प्रचार होईल. व महाराष्ट्र शासन दखल घेईल की, आपली एकच मागणी शिवरत्न जिवा महाले जयंती शासनस्तरावर झालीच पाहिजे.
जय संत सेना महाराज
