संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटरच्या ८६ व्या तुकडीस मार्गदर्शन..!
कोपरगांव प्रतिनिधी:-
स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाची व देशाच्या प्रगतीसाठी कष्ट करून एक वेगळ्या उंचीवर पोहचलेल्या व्यक्तींचा आदर्श घ्यावा. सुदृढ शरीर असलेल्या व्यक्तीचे मनही खंबीर आणि चांगल्या विचारांचे असते. त्यासाठी शारीरिक परीश्रम घेण्याची गरज आहे. परीश्रम करणाऱ्याला यश हमखास मिळते, असे प्रतिपादन कोपरगांव ग्रामिण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री दौलतरा जाधव यांनी केले.
संजीवनी प्रि कॅडेट सेंटरमध्ये नव्याने भरतीपुर्व प्रशिक्षणार्थी कॅडेटलसच्या ८६ व्या तुकडीला मार्गदर्शन करताना श्री जाधव बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर सेंटरचे वरिष्ठ अधिकारी श्री अशोक थोरात उपस्थित होते.
जाधव पुढे म्हणाले की येथे प्रशिक्षणास प्रवेश घेतलेले सर्व नवयुवक भाग्यवान आहेत. ग्रामिण भागातील मुलांमध्ये शारीरिक व बौध्दिक क्षमता असतात. त्यांच्याकडील या संपत्तीला योग्य आकार मिळाल्यास ते यशस्वी होतात हे अनेकदा सिध्द झालेले आहे. संजीवनीच्या प्रि कॅडेट सेंटर मधुन हे काम शास्त्रशुध्द पध्दतीने केल्या जाते, हे मागील अनेक तुकड्यांमधील कॅडेटसच्या यशावरून सिध्द झाले आहे. पोलीस, डिफेन्स, रेल्वे सुरक्षा, आदी क्षेत्रातील भरती पारदर्शक आहे. भविष्यात कोणाकडून फसवणुक होणार नाही याची काळजी घ्यावी. स्पर्धेतुनच निवड झाली पाहीजे, ही जिध्द मनात ठेवावी. येथिल प्रशिक्षणातुन सकाळी लवकर झोपेतुन उठणे, व्यायाम करणे, वेळेवरच जेवण व नास्था घेणे, दुसऱ्या प्रति आदर ठेवणे, दुसऱ्याला संकटात मदत करण्याची भावना ठेवणे, अशी जीवनाची शिस्त लागणार आहे. मात्र ही शिस्त प्राशिक्षण पुर्ण झाल्यावरही अंगिकारने गरजेचे आहे. येणाऱ्या काळात सैन्यदल, पोलीस विभागात अनेक जागा निघणार आहे, कारण बऱ्याच दिवसांपासुन कोरोना महामरीमुळे भरती प्रक्रिया थांबलेली आहे. तेव्हा येणाऱ्या संधींचे सोने करा, असे जाधव पवार शेवटी म्हणाले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री सुमित कोल्हे म्हणाले की ग्रामिण भागातील नवतरूण कमी संख्येने सैन्यदलात भरती होतात, त्यांना योग्य प्रशिक्षण दिल्यास त्यांना सैन्यदलासह इतर क्षेत्रातही संधी मिळेल, ग्रामिण भागातील कुटूंबे सक्षम होतील, या विचार धारेतुन माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे यांनी १५
. सप्टेंबर, १९९२ रोजी संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. त्यांनी सुरू केलेले कार्य कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे नेटाने पुढे घेवुन जात ग्रामिण भागातील कुटूंबाना सक्षम करीत आहेत. आज पर्यंत येथुन सुमारे ३००० नवयुवकांना वेगवेगळ्या क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या. विशेषतः सैन्यदलात मोठ्या संख्येने नवयुवक सामिल झाले आणि त्यंनी देश सेवेसाठी वाहुन घेतले. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी नुकतेच ५२०० पोलीसांची भरती या डिसेंबर २१ अखेर करण्यात येणार आहे, असे सुतोवाच केले आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी ग्रामिण भागातील नवयुवकांनी संजीवनी प्रि कॅडेट सेंटरशी संपर्क साधुन तीन महिण्यांचे प्रशिक्षण पुर्ण करावे, असे आवाहन श्री कोल्हे यांनी शेवटी केले.
सदर प्रसंगी श्री थोरात यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री विजय भास्कर यांनी सुत्रसंचलन केले तर श्री डी. के. कानडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी. व्ही. तिवारी, एम.व्ही. मुरडनर व श्री नामदेव केदार यांनी विशेष परीश्रम घेतले.

फोटो ओळी:-
संजीवनी प्रि कॅडेट सेंटरच्या ८६ व्या तुकडीला मार्गदर्शन न करताना पोलीस निरीक्षक श्री दौलतराव जाधव . यावेळी श्री सुमित कोल्हे, अशोक थोरात व्यासपीठावर उपस्थित होते.
