

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व समता इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने समता स्कूल येथे शाडू मातीपासून गणपती तयार करण्याचे वर्कशॉप घेण्यात आले.


यावेळी इयत्ता 7 वी ते 9 वी च्या एकूण 160 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व सुंदर गणपती मुर्त्या तयार केल्या आणि याच बनवलेल्या गणपती बाप्पाची स्थापना मुले आपल्या घरी करणार आहे व विसर्जनाच्या दिवशी आपल्या घरीच एक कुंडीमध्ये बाप्पाचे विसर्जन करून त्यात एक झाड लावण्याचा संकल्प करण्यात आला. त्यामुळे काही प्रमाणात का होईना पर्यावरणाचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. यावेळी समता स्कूल च्या संचालिका स्वाती कोयटे,लायन्स क्लब चे राम थोरे,अक्षय गिरमे,सुमित भट्टड,सुरेश शिंदे,पंकज ठोळे,सुजित वरखेडे तर लिओ क्लब चे आदित्य गुजराथी,पृथ्वी शिंदे,ओंकार भट्टड, माधव बजाज तसेच समता स्कूल च्या मुख्याध्यापिका लिझा बर्धन व इतर शिक्षक उपस्थित होते.यावेळी मुलांना अनिकेत सोनवणे,साक्षी सोनवणे आणि मयूर जाधव यांनी मार्गदर्शन केले.
