
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव शहर विकासाच्या प्रत्येक ठरावाला आजवर कोल्हे गटाच्या भाजपा सेना नगरसेवकांनी सकारात्मक भूमिका घेत पालिका सभागृहात मंजु-या दिलेल्या आहेत, परंतु विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपटटी करण्यांचे मनसूबे काहींनी आखले म्हणून 28 कामांचा प्रश्न न्यायालयात गेला त्यातील 22 कामांना आमचा कुठलाही विरोध नाही प्रश्न फक्त 6 वादग्रस्त कामाबाबत आहे त्यासाठी भाजपा सेना नगरसेवकांनी विशेष सर्वसाधारण बोलाविण्यांची मागणी केली आहे त्याचा पाठपुरावा आमदार आशूतोष काळे यांनी करावा, उठसुठ वृत्तपत्र अगर सोशल मिडीयातुन त्यावर बगलबच्च्यामार्फत गरळ ओकु नये उलट आमदार काळे व त्यांचे समर्थकच यात राजकारण डोळयासमोर ठेवुन आमचे मागणीला प्रतिसाद देत नाहीत असे परखड मत उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिध्दीस दिले आहे.
श्री. अरिफ कुरेशी यांनी पुढे म्हटले आहे की, 28 पैकी 22 कामांना आमचा विरोध नाही त्यापैकी तीन कामांचे जास्तीचे अंदाजपत्रक व ज्याची षहराला गरज नाही अशी 3 कामे अनावश्यक आहे. या सहा कामात जनतेच्या पैशाची उधळपटटी होवु नये, यात वाचलेल्या पैशातुन अन्य विकासकामे होवु शकतात पण सामजस्याने हा प्रश्न सुटला तर आगामी राजकीय गणीत बिघडेल की काय याभितीपोटी लोकप्रतिधिी व त्यांच्या नगरसेवकांच्या दबावामुळे नगरपालिका प्रशासनांने या विषयावर आठमुठेपणांची भुमिका घेतली आहे. भाजपा सेना नगरसेवकांनी वादग्रस्त सहा कामे बाजुला ठेवुन उर्वरित 22 कामांना हरकत नसल्याचे स्पश्ट केले आहे. जर विशेष सर्वसाधारण सभा बोलावुन हा विषय स्थानिक पातळीवरच सुटला तर आपल्याच शहरवासियांना होणारा त्रास टळणार आहे अशी भूमिका भाजपा सेना नगरसेवकांनी घेतली आहे. पालिका प्रशासनांने 28 कामांचे विषय वेगवेगळे न घेता ते एकत्र घेवुन एकच ठराव पालिका सभागृहात बैठकीपुढे ठेवला. मात्र या कामांचे विषय वेगवेगळे ठेवुन त्यावर सांगोपांग चर्चा करून मंजुर-नामंजुर करता आले असते परंतु या 28 कामातील 6 वादग्रस्त कामे नामंजुर होतील याभितीपोटी विरोधकांनी ती मुददामहुन एकत्र घुसडवली. शहरातील जनतेला कितीही त्रास झाला तरी चालेल मात्र राजकीय डावपेच शिजण्यांसाठी आमदार आशूतोष काळे व त्यांच्या नगरसेवकांमार्फत पालिका प्रशासनावर दबाव टाकुन जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्यासमोर अपिल दाखल केले, आणि याच अपिलामुळे 28 कामाबाबत न्यायालयीन प्रक्रिया चालु झालेली आहे., याचाच अर्थ आमदार आषुतोश काळे व त्यांच्या नगरसेवकांनी पालिका प्रशासनांच्या खांद्यावर बंदुक ठेवुन सोयीचे राजकीय धोरण घेतले. वास्तविक पाहता आमदार आशूतोष काळे यांनी मनाचा मोठेपणा दाखवुन जनतेचा सेवक म्हणून ज्या 6 वादग्रस्त कामाबाबत भाजपा सेना नगरसेवकांनी तक्रार दाखल केली त्याबाबत पालिका प्रशासनाकडुन योग्य ती माहिती घेवुन हा विशय सुटण्याकामी पुढाकार घेवुन विशेष सर्वसाधारण सभा घेण्याबाबतची आमची मागणी पालिका प्रशासनाला मान्य करायला लावायला पाहिजे होती परंतु आमदार आशूतोष काळे व त्यांच्या नगरसेवकांनी पालिका निवडणुकीचे घाणेरडे राजकारण डोळयासमोर ठेवुन शहरवासियांना त्रास झाला तरी चालेल पण भाजपा सेना नगरसेवक कसे बदनाम होतील हे स्वार्थी धोरण स्विकारले व याविशयाकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले. वादग्रस्त सहा कामे वगळता उर्वरित 22 कामे व्हावी यासाठी भाजपा सेना नगरसेवकांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली होती.
केपरगांव शहरातील धारणगांवरोड, इंदिरा पथ, बॅंक रोड हे तीन प्रमुख रस्ते व्हावे म्हणुन शहरातील जनता दोन वर्षापासून आमदार आशूतोष काळे व पालिका प्रशासनाकडे मागणी करत आहे. यासाठी भाजपा सेना नगरसेवकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा देखील केलेला आहे. या रस्त्यांचा त्या 28 कामात समावेश नाही परंतु आमदार आशूतोष काळे व पालिका प्रशासन देखील ही कामे करण्यांसाठी सकारात्मक नाहीत.
आमदार आशूतोष काळे यांनी राजकारण डोक्यात न ठेवता शहरातील जनतेचे हाल थांबविण्यांसाठी रस्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची भाजपा सेना नगरसेवकांची जी मागणी आहे त्याबाबत त्यांनी त्यांच्या नगरसेवकांना व पालिका प्रशासनाला सुचना देवुन विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यांस भाग पाडावे व हा प्रष्न स्थानिक पातळीवरच निकाली काढण्यांसाठी प्रयत्न करावे असे शेवटी उपगनराध्यक्ष अरिफ कुरेशी यांनी स्पष्ट केले आहे.
