ब्राह्यण सभा कोपरगांवच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी,आजी माजी शिक्षक ,उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा गुणगौरव कार्यक्रम उत्साहाने संपन्न..!!

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांवातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ब्राह्यण सभा.कोपरगांव यांच्या विदयमाने नुकताच गेल्या तीन वर्षात एस.एस.सी.परीक्षा ते पदवी,पदव्युत्तर ,तसेच शिक्षक दिना निमित्तानं शहरातील शाळा,महाविदयालय प्राचार्य,आजी माजी शिक्षक व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या,निवड झालेल्या व्यक्तीचा गुणगौरव समारंभ नुकताच ब्राम्हण सभा मंगल कार्यालयात उत्साहाने संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अहमदनगर येथिल दै.समाचारचे संपादक श्री.महेंद्र कुलकर्णी मार्गदर्शन करत होते.

येथिल भा.ज.पा.शहराध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे यांच्या शुभहस्ते पारीतोषिक वितरण झाले.नासिक येथिल प्रसिध्द उद्योगपती श्री.धनंजय बेळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ब्राम्हण सभेचे माजी अध्यक्ष श्री.सुधाप्पा कुलकर्णी ,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,माजी नगराध्यक्षा सौ.ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई,प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक श्री.प्रसाद नाईक या प्रसंगी उपस्थित होते. कोपरगांव येथे ब्राह्यण सभेच्या कार्यक्रमात क्रेडाई च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक श्री.प्रसाद नाईक यांचा सत्कार करण्यात आला.


प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत उपाध्यक्ष राजेंद्र जवाद, बी.डी.कुलकर्णी,यांनी केले.भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्यण सभेचे अध्यक्ष श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.प्रमुख पाहुणे धनंजय बेळे यांनी मार्गदर्शन करतांना समाजाचे संघटन करणे खुप अवघड काम असुन सर्व समाज घटकांनी त्यासाठी एक विचाराने राहणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले.अहमदनगरचे श्री.भैय्या गंधे यांनी ब्राह्यण सभेच्या उपक्रमांचे कौतुक करुन ब्राह्यण सभेच्या विविध उपक्रमला भरभरुन मदत करु असे सांगितले.यावेळी ब्राह्यण सभेचे बांधकाम समितीचे प्रमुख प्रसाद नाईक यांनी मंगल कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असुन येत्या जानेवारीत ते सर्वासाठी उपयोगात येईल असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.महेंद्र कुलकर्णी यांनी मी मुळचा कोपरगांवचा असुन मला तालुकास्तरावर समाजाने स्वतःचे मंगल कार्यालय उभे केले याचा निश्चित अभिमान वाटतो असे स्पष्ट केले.युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या पायावार उदयोगात भरारी घ्यावी असे सुचविले.
या प्रसंगी विविध क्षेत्रात निवड झालेल्या, यश संपादन केलेल्या व्यक्ती,शिक्षक दिना निमित्तानं शाळा,महाविदयालयांचे प्राचार्य,आजी माजी शिक्षक तसेच विदयार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.गुण गौरव कार्यक्रमाचे संचलन खजिनदार जयेश बडवे,संघटक महेंद्र कुलकर्णी,सहसचिव संदीप देशपांडे,अजिंक्य पदे,सदा धारणगांवकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन श्री.अनिल कुलकर्णी व सौ.रुपाली देशपांडे यांनी केले. आभार प्रदर्शन माजी अध्यक्ष संजीव देशपांडे यांनी केले.कार्यकारीणी सदस्य माजी अध्यक्ष वसंतराव ठोंबरे,डाॕ.मिलींद धारणगांवकर,अॕड.सौ.श्रध्दा जवाद,सौ.वंदना चिकटे,सहखजिनदार योगेश कुलकर्णी ,संघटक गौरीष लव्हरीकर आदी सह बहुसंख्य समाजबांधव,विद्यार्थी,आजीमाजी शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते.कोपरगांवची गानकोकीळा सुरभी कुलकर्णी हीने गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *