


कोपरगाव प्रतिनिधी:- मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष व मराठा मोर्चाच्या राज्याच्या समन्वयक सौ.अस्मिता देशमुख व त्यांच्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेत राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार उपस्थित होते.


