

कोपरगाव प्रतिनिधी:- राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे.कोपरगाव तालुक्यात पाऊस पडत आहे.आज शनिवार कोपरगाव तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला यामुळे शहरातील खडकी भागात अतिवृष्टीमुळे घरात पाणी जाण्यास सुरुवात झाली होती.पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे खडकी भागात पाणीच पाणी झाले होते. यासंदर्भात आमदार आशुतोष दादा काळे यांना काही नागरिकांनी कार्यकर्त्यांनी माहिती दिली.आमदार . आशुतोषदादा काळे यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्वरित जेसीबी उपलब्ध करुन दिला. जेसीबीच्या साहाय्याने पाण्याला नाल्यामध्ये वाट करून दिल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेले नाही. खडकीच्या नागरिकांच्या सोयीसाठी त्वरित जेसीबी उपलब्ध करून दिल्याबद्दलत आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचे सर्व खडकीच्या नागरिकांनी आभार मानले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले, नवाज कुरेशी,दिनकर खरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रसचे.पदाधिकारी उपस्थित होते.

