
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील सर्व नागरिकांना कळविण्यात येते कि, मिशन ब्रेक द चैन अंतर्गत शनिवार दि.१५/०५/२०२१ पासून ते शुक्रवार दि.२१/०५/२०२१ पर्यंत दररोज सकाळी ७.०० ते ११.०० वा.पर्यंत दवाखाने, मेडिकल यासह भाजीपाला, फळे, किराणा, दुध व दुग्धजन्य पदार्थ, पाणीजार, पशुखाद्य, कृषी विषयक सेवा इ. अत्यावश्यक सेवा सुरु राहतील व इतर सर्व आस्थापना बंद राहतील.
सर्व भाजीपाला व फळे विक्रेते यांनी आपली दुकाने नवीनबाजार ओटे येथेच लावावीत. या व्यतिरिक्त शहरात कुठेही विक्री करू नये.
कोपरगाव शहरातील सर्व नागरिक, आस्थापना, व्यापारी सर्वांनी याची नोंद घ्यावी.
कृपया अत्यावश्यक कामा शिवाय कोणीही घराबाहेर पडू नये.
कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
नियमांचे उल्लंघन करू नये. आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
घरी राहा. सुरक्षित राहा.
(यापुढे दि.२२ मे पासूनच्या दर शनिवार व रविवार जनता कर्फ्यू राहील.)
विजय वहाडणे नगराध्यक्ष
स्वप्निल निखाडे उपनगराध्यक्ष
सर्वपक्षीय नगरसेवक
कोपरगाव नगरपरिषद
कोरोना नियंत्रण समिती, कोपरगाव
