मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळ यांचे संयुक्त विद्यामानें श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- गेल्या १६ वर्षापासून मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतिने साई चरित्र पारायण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते.याही वर्षी सर्व साईभक्तांना कळविण्यात येते की, सालाबादप्रमाणे श्रावण मासा निमित्त गुरुवार दि. २६/८/२०२१ ते गुरुवार दि. २/९/२०२९ पर्यंत श्री साईसच्चरित्र पारायण सोहळा आरंभ होत आहे. सदर पारायण सोहळ्यास ज्यांना बसावयाचे आहे, त्यांनी आपली नावे खालील पत्यावर नोंदवावे व साईसच्चरित्र पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा.असे आयोजका कडून कळविण्यात येत आहे. सुवर्णकार भवन, सराफ बाजार, कोपरगांव, जि. अ. नगर या ठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले असुन पारायणाची वेळ सकाळी ६.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत आहे.श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन केले असुन महाप्रसाद गुरुवार दि. २/९/२०२१ रोजी कोरोना विषाणुच्या प्रार्दुभावामुळे महाप्रसाद घर पोहोच करण्याचे योजीले आहे.या पारायण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नांव नोंदणी साठी संपर्क
दत्ता उदावंत ९५९५९४२४९३, कुणाल लोणारी : ८७९३५३२६२८, संजय मंडलिक ९८९०११८२७१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मा. श्री. योगेश भाऊ बागुल, मा.उपनगराध्यक्ष कोपरगांव, मुंबादेवी तरूण मंडळ, सुवर्णकार मित्र मंडळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *