
कोपरगांव प्रतिनिधी:-
विसपुते सराफी पेढीच्या वतीने उत्सुकतेने आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेल्या कार्यक्रमात दुसऱ्या महापैठणीच्या विजेत्या म्हणून गणेश फरसाण मार्टच्या सौ.कविता सोमनाथ लाडे यांच्या नावाची घोषणा होताच टाळ्यांचा कडकडाट झाला.लग्नसराईनिमित्त विसपुते सराफी पेढीच्या विवाह अलंकार – बस्ता फेस्टिवल या योजनेतील रु. एक लाख किमतीच्या दुसऱ्या पैठणीचा बक्षिस समारंभ व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधून पेढीवर पार पडला.येत्या 15 मार्चपर्यंत चालणाऱ्या या योजनेला दुसऱ्या टप्प्यात पंचक्रोशीतून ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यातूनच 14 फेब्रुवारीला रुपये 1 लाख किमतीच्या दुसऱ्या महा पैठणीचा बक्षीस समारंभ झाला, त्यात सौ.कविता लाडे दुसऱ्या महापैठणीच्या मानकरी ठरल्या. ” दागिने आणि पैठणी हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. प्रत्येकीच्या मनात रुजलेली ही दोन्ही स्वप्ने एकाचवेळी प्रत्यक्षात आणणाऱ्या विसपुते सराफ यांचा हा उपक्रम खरोखरच कोपरगावकारांसाठी अभिमानास्पद आहे ” अशा शब्दात कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि महाराष्ट्राची सौंदर्य साम्राज्ञी किताबाच्या मानकरी ठरलेल्या डॉ. दीपाली आचार्य यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .डॉ. अभिजित आचार्य यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.


ही योजना आता तिसऱ्या टप्प्यात असून येत्या 15 मार्च रोजी रु.1 लाख किमतीची महापैठणी जिंकण्याची अजून एक संधी ग्राहकांना मिळणार आहे.या कार्यक्रमात कापसे पैठणीचे संचालक दिलीप खोकले यांनी या महापैठणीचे वैशिष्ट्य उलगडून सांगितले . या कार्यक्रमाचे स्वागत- प्रास्ताविक पेढीचे युवा संचालक यश विसपुते यांनी केले.कार्यक्रमाला येवला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.भगवान मथुरे साहेब हे उपस्थित होते .त्यांचा सत्कार यश विसपुते यांच्या हस्ते करण्यात आला तर दिलीप खोकले यांचा सत्कार पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी केला. कार्यक्रमाला साखरवाडी कारखान्याचे आर .एन .डी .विभागाचे व्यवस्थापक शोणम पगारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ,त्यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन आनंद क्षेमकल्याणी यांनी केले तर विवेक नागरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
