
कोपरगाव प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या कोपरगाव पालिकेच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे नुकतीच धुळे महानगरपालिकेतून बदलून आलेले शांताराम गोसावी यांनी स्वीकारली आहेत. याबद्दल त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी (ता.१७) सत्कार करण्यात येऊन शहर विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष सतीश काकडे, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, हिंदु सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे, विद्यार्थी उपशहराध्यक्ष संजय जाधव, गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, युवा नेते नवनाथ मोहिते, विक्रम काकडे, विकी चव्हाण, राजू भालेराव आदी मनसैनिक उपस्थित होते. सध्या कोविडचे संकट सुरू असून, पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता आणि आरोग्य यादृष्टीने नूतन मुख्याधिकारी गोसावी यांना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासह इतर संघटनांशी समन्वय साधून काम करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनेही शहर विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.
