महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत अध्यक्ष श्री .माननीय कल्याणराव जी दळे साहेब यांच्या वाढदिवसाचे निमीत्ताने अहमदनगरमधील भटक्या विमुक्ती जमातीतील तांड्यावर लहान मुलामुलींना फळे व बिस्कीट खाऊचे वाटप करून साजरा करण्यात आला..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत अध्यक्ष श्री .माननीय कल्याणराव जी दळे साहेब यांच्या बावन्नाव्या वाढदिवसाचे औच्चीतानिमीत्ताने अहमदनगरमधील भटक्या विमुक्ती जमातीतील तांड्यावर लहान मुलामुलींना फळे व बिस्कीट खाऊचे वाटप करुन श्रीमान कल्याण रावजी दळे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

या प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अ नगर जिल्हा अध्यक्ष श्री बाळासाहेबजी भुजबळ जिल्हा महीला अध्यक्ष सौ वनिता रमेश बिडवे ताई जिल्हा उपाध्यक्ष श्री . अनिल निकम साहेब तसेच सचिव श्री बापूसाहेब औटी जिल्हा युवा अध्यक्ष श्रीनिलेशजी पवळे . शहर अध्यक्ष श्री श्रीपादजी वाघमारे व बारा बलुतेदार महासंघाचे कार्याध्यक्ष श्री रमेशजी बिडवे . नाभिककृती समीतीचे प्रांत अध्यक्ष श्री अशोकजी औटी साहेब तसेच बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य श्री . मुरलीधरजी मगर साहेब उपस्थीत होते श्री रमेशजी बिडवे व सौ वनिता ताई बिडवेचा पुढे यांच्या मार्गदर्शनाखाली तांड्यावरील मुलामुलींना काही शैक्षणिक आर्थिक इतर काही प्रसंगी तेथील कार्यक्रम घेतले जातील असे जिल्हा अध्यक्ष श्री बाळासाहेब भुजबळ यांनी सांगीतले या प्रसंगी भटक्या विमुक्त जमातीतील प्रमुख उपस्थीत होते त्यांनी सर्व उपस्थीतांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *