
कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयामध्ये २६जानेवारी ७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहण संपन्न
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात २६जानेवारी ७३व्या प्रजासत्ताक दिना निमित्तानं जैन मुनि १०८ श्री वर्धमान सागरजी महाराज यांनी विदयार्थी,शिक्षकांना मार्गदर्शन केले.ते पुढे म्हणाले की विदयार्थीनी शिक्षण घेत असतांना देशा विषयी आत्मियता ठेवावी. म.गांधीनी भगवान महावीर यांचे अहींसा तत्त्वाचा वापर केले. म.गांधी आणि त्यांच्या सहका-यांनी अहिंसा व असहकार आंदोलनाने देश स्वतंत्र्य केला. तेव्हा हे स्वातंत्र्य आपल्याला टीकवणे आवश्यक आहे.अलिकडे काही व्यक्ती विघातक कृत्य करुन राष्ट्रीय संपत्तीची नुकसान करतात,ती एक प्रकारची हिंसा आहे ती थांबवली पाहीजे.आपण ज्या देशात राहतो तिथले नैसर्गिक साधन-संपदा,संपत्ती इतर बाबी जतन केल्या पाहीजे.दिवसेंदिवस मुलामध्ये देशप्रेम कमी होत आहे ते वाढवण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक आहे.आपल्या वैयक्तिक स्वार्थसाठी देशाचे नुकसान करु नका असे आवाहन त्यांनी या प्रसंगी सर्वाना केले.
प्रारंभी ७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत प्राथमिक विभागाचे ध्वजारोहण मुख्याध्यापिका मिना पाटणी तर श्रीमान गोकुळचंदजी विदयालय माध्यमिक विभागात ध्वजरोहण मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.
या प्रसंगी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे सचिव दिलीप अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे, संदीप अजमेरे,उपमुख्याध्यापक रवि पाटील,पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे श्री,कैलास ठोळे ,दिलीप अजमेरे आपल्या भाषणात देशाने स्वातंत्र्यानंतर केलेल्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आलेख मांडला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरकर डी.व्ही यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा शिक्षक ए.के.काले,एन.के.बडजाते,डी.पी.कुडके,ए.बी.अमृतकर,ए.जे.कोताडे यांनी केले. हा कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळुन संपन्न झाला.
