जातीच्या दाखल्यांची शाळेत महाविद्यालयातच वाटप व्हावे:- रवींद्र साबळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
‌ राज्यात गेल्या चार वर्षापासून सुवर्ण जयंती राजस्व अभियान यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे .त्यात काही नवीन लोकाविमुख व प्रशासकीय घटकांचा समावेश करून महाराजस्व अभियान चालू आहे. जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यालयापासून ते गाव पातळीपर्यंत राबवण्यात यावी. यामध्ये विविध दाखले शिबिरे घेऊन प्रदान करण्यात यावे. सर्वसामान्य जनतेस शैक्षणिक व अन्य कामाकरता विविध स्वरूपाच्या दाखल्याची आवश्यकता असते यासाठी प्रक्रिया सोपी करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना लागणाऱ्या प्रमाणपत्र करिता सहामाई / वार्षिक परीक्षा पूर्वी किंवा सुट्टीच्या दिवशी सर्वसामान्य जनतेला आवश्यक असणाऱ्या दाखल्यांसाठी जनतेच्या सोयीनुसार मध्यवर्ती ठिकाणी जनतेस आवश्यक त्या कागदपत्रांची माहिती द्यावी व त्याच ठिकाणी अर्ज भरून त्याठिकाणी विविध दाखले निर्गमित करण्यात यावे यासाठी
‌1) तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय किंवा अन्य वाटप केंद्रांची संख्या निर्धारित करण्यात यावी.
‌2) ज्या ठिकाणी दाखले वाटप करावयाचे त्याच्या तारखा निश्चित करण्यात याव्या.
‌3) शिबिरासाठी ज्या शाळा महाविद्यालय निश्चित केले त्या मुख्याध्यापक/ प्राचार्यांना विविध प्रमाणपत्र करिता आवश्यक असलेले छापील नमुने व असणार्‍या कागदपत्रांची यादी पुरवण्यात यावी, जेणेकरून विहित नमुन्यात अर्ज विद्यार्थ्यांकडून प्राप्त होईल.
‌4) शिबिराच्या दिवशी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहील हे निश्‍चित करावे जेणेकरून विद्यार्थ्यास त्यादिवशी प्रमाणपत्र देण्यात यावे.
‌ 5) या संदर्भात शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 02/2010/प्र. क्र.15/ई-1 दिनांक 3 ऑगस्ट 2010 सविस्तर कार्यपद्धती देण्यात आलेली आहे त्या कार्यपद्धतीचे पालन करण्यात यावे तसेच सविस्तर समाधान योजना राबविण्यात याव्यात या आशयाचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांच्या हस्ते जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले यावेळी कोपरगाव काँग्रेस पार्टीचे युवा नेते आकाश नागरे, कोपरगाव शहर अध्यक्ष रवींद्र साबळे, अ.जा. विभाग महिला जिल्हाध्यक्ष सौ सविता विधाते, अ.जा. विभाग यादव त्रिभुवन, विष्णु पडेकर, युसुफभाई शेख, शबीर शेख, छोटूभाई पठाण , अबूबकर मणियार, राजेंद्र पोटे,संजय आव्हाड, सौ मंगल आव्हाड, मयूर गोरे, युनूस शेख, अल्तमस शेख, सतीश साबळे , राजन त्रिभुवन, बाबुराव पवार, राजेंद्र घोडेराव ,राजेंद्र लोहकरे ,अजहरुद्दिन मणियार, किशोर शेलार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *