साई द्वारकामाई प्रतिष्ठान व साई निर्माण करिअर अकॅडमी मध्ये गणपती बाप्पांचे आगमन; सर्व मित्रपरिवारा सोबत उत्साहात स्वागत करण्यात आले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
साई द्वारकामाई प्रतिष्ठानचा राजा; दि.१० सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे साई द्वारकामाई प्रतिष्ठान व साई निर्माण करिअर अकॅडमी मध्ये आगमन झाले, सर्व मित्रपरिवारासोबत बाप्पांचे उत्साहात स्वागत करण्यात आले, गणपती बाप्पांची स्थापना व पुजेसाठी अकॅडमीचे शिक्षक तथा संचालक श्री प्रमोद कदम सर व प्रतिष्ठानचे सदस्य श्री बळीराम सुर्यवंशी या दोघांच्या हस्ते सपत्नीक पुजा गुरू सुशिल रत्नपारखी यांनी विधीवत, प्रसन्न व भक्तीमय वातावरणात बाप्पांची घटस्थापना करून आरती करण्यात आली…


या वर्षीपासून पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून तुरटीपासून बनविलेला गणपतीची स्थापना साई द्वारकामाई प्रतिष्ठान वतीने करण्यात आली..


प्रसंगी साई निर्माण उद्योग समूहाचे चेअरमन श्री विजूभाऊ कोते पाटील, साई द्वारकामाई प्रतिष्ठानचे सदस्य, साई निर्माण करिअर अकॅडमीचे शिक्षक, होस्टेलचे विद्यार्थी, विद्यार्थीनी व मित्रपरिवार उपस्थित होते..
जय साईनाथ !!
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती_मोरया..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *