
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे सोबत…दि ग्रेट भेट…..
कोपरगाव प्रतिनिधी:-
माजी आमदार अनिलदादा आहेर यांचे चिरंजीव दर्शन भाऊंचे लग्न आटोपून परतत असताना देशातील एकमेव विवीध वैशिष्ट्यांनी समृद्ध सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी शैक्षणीक संकुलांना जळगावचे भाजपाचे खासदार उन्मेष पाटील यांनी भेट दिली.
यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी त्यांचे फेटा बांधून केलेले स्वागत केले.

खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, देशातील एकमेव इथोनाल प्रकल्प, सॅनिटायझर, पॉरासिटोमॉल औषधीं बनविणारा सहकारातील पहिला कारखाना, कोरोना महामारीत जनतेची रामायणात भगवान हनुमानाने आणलेल्या संजीवनी औषधी प्रमाणे पंचक्रोशीतील हजारो लोकांची सेवा करणारा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आहे सत्याग्रही शेतकरी नेते.व या परिसराचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव गेणुजी कोल्हे यांच्या जीवनप्रवासाची त्यांनी माहिती घेतली. अतिशय प्रेरणादायी वाटचाल करताना उभारलेला कारख्यान्यात सर्व विभागांना भेटी दिल्या याबद्दल त्यांनी समाधान यक्त्य केले . अधिकारी, तंत्रज्ञ, संशोधक यांच्याशी संवाद साधला. पाच हजार परिवाराचे पोशिंदे बिपिन दादा कोल्हे यांच्या सोबत चर्चा करतांना त्यांनी दिलेले अनेक मार्गदर्शक दाखले भावी वाटचालीस मदत करणार आहेत. संजीवनी परिवाराचा विस्तार अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा अशी सदिच्छा खासदार पाटील यांनी व्यक्त केली, शेवटी बिपिन दादा कोल्हे यांचे आभार मानले.
