

कोपरगाव प्रतिनिधी:-
२ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने ओ बी सी आरक्षण टिकवण्यासाठी आपल्या हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलन व निवेदन देण्याचे आवाहन केले होते.


त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा,कोपरगाव तालुक्याच्या वतीने २ जुलै रोजी कोपरगाव तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलन व निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी खालील समाज बांधव उपस्थित होते
रमेश गवळी,रामदास गायकवाड,ज्ञानेश्वर लोखंडे सर,सुरेश सोनवणे,राजेश वालझाडे,गोरख देवडे, किरण व्यवहारे,सागर सोमवंशी,राजेंद्र रघुनाथ राऊत,विजय सोनवणे,राजेंद्र व्यवहारे,बाबासाहेब चौधरी, राजेंद्र लक्ष्मण राऊत.
