उपजिल्हा रुग्णालयाचे मंजुरीचे खरे प्रयत्न सौ.स्नेहलाताताई कोल्हे यांचेच:- डी.आर.काले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
दीड वर्षे मौन धारण केलेले आमदार साहेब स्वत: अखेर काही का होईना बोलले हे मतदारसंघाचे भाग्यच मानावे लागेल. कारण गेली दिड वर्षे आमदार साहेबांचे विचार, त्यांची भुमिका जनतेला फक्त सोशलमिडीया, वर्तमान पत्रातील बातम्या याव्दारेच समजत होती. कोपरगांव ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयाचे रुपांतर झाले या विषयांवर बोलताना आमदार साहेब खरे बोलले पत्र देवुन कोणतेही काम होत नाही त्यासाठी पाठपुरावाच करावा लागतो.
आमदार म्हणुन आपण निवडुन आल्यानंतर गेली दिड वर्षेपासुन महाऱाष्ट्रात कोरोनाचे संकट आलेले आहेत. कोरोना महामारीच्या निवारणासाठी गेली दिड वर्षे राज्यसरकार व त्यांचे प्रशासन झटत आहे. राज्याचा बहुतांश आर्थिक निधी कोरोना आपत्ती निवारण्यासाठी खर्च करण्यात आलेला आहे.त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. या कारणामुळे राज्य सरकारने 4 मे 2020 रोजी कोरोनामुळे राज्याची झालेली बिकट आर्थिक परिस्थीती बघता असा अध्यादेश काढला होता की, राज्यातील कोणत्याही नविन योजनांचे – नविन कामाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करु नये, असे असतांना आमदार साहेब आपण सांगता 30 सप्टेंबर 2020 रोजी आपण दिलेल्या प्रस्तावामुळे ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाले आहे, हे कसे काय शक्य आहे. आपण फक्त हेच एकमेव पत्र याकामासाठी दिलेले दिसते या पत्रा व्यतिरीक्त आपण याकामासाठी दुसरा कोणताही पाठपुरावा केल्याचे दिसुन येत नाही. असे असताना आमदार साहेब आपण अर्धवट माहिती देवुन कोपरगांवच्या जनतेची दिशा भुल करु नये.
माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी सन 2015 पासुन तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांच्याकडे पत्रव्यवहार करुन व पाठपुरावा करुन ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करावे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. सन 2018 च्या हिवाळी अधिवेशना मध्ये या विषयावर प्रश्न उपस्थित करुन लक्ष वेधले होते. तत्कालीन सरकारने सन 2011 च्या जनगणनेवर आधारीत आरोग्य संस्थाचा जोड बहुत आराखाडा तयार करण्याचे काम आरोग्य सेवा संचानलयास्तरावर सुरु असुन कोपरगांव ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याची मागणी निकषांनुसार जोडबहुत आराखाड्यामध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार आरोग्य सेवा संचालनालयाने प्रस्तावास त्याचवेळेस मान्यता दिली होती. याचाच साधासोपा अर्थ असा आहे की, माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे उपजिल्हा रुग्णालय मंजुर झालेले आहे, हे आपण जरी नाकारत असाल तरी हे जनतेच्या लक्षात आलेले आहे. आमदार साहेब उपजिल्हा रुग्णालय मंजुर झाल्याबाबतचे आरोग्य मंत्रालयाचे पत्र आपण पत्रकारांना दाखविले.आमदार साहेब कोणतीही सरकारी योजना किंवा प्रस्ताव मंजुर झाले बाबतचे पत्र हे विद्यामान आमदार म्हणुन आपणालाच कळविण्यात येईल हे सर्व जनतेला माहित आहे. याचा अर्थ असा नाही त्याकामाचे प्रयत्न आपण केले म्हणुन ते पत्र आपणाला देण्यात आले.
आपण त्या पत्राचा आधार घेवुन साक्षात जनतेसमोर चुकीची माहिती दिली या गोष्टीचा आम्ही जाहिर निषेध करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *