
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोर्ट रोड रस्त्याला कै मच्छीन्द्र राक्षे यांचे नाव द्यावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर पालिकेचे प्रशासक यांना केले आहे
आपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव कोर्टाच्या बाजूने पॉवर हाऊस, मर्चंट बँक रोड व ईदगाह मैदान रोड या सर्वच रस्त्याचा उल्लेख कोर्ट रोड असा केला जातो त्यामुळे नागरिकांमध्ये नेहमी संभ्रम निर्माण होतो नुकतेच नगर पालिकेच्या माध्यमातून या रस्त्याचे नूतनीकरण व डांबरीकरण झाले आहे
त्यामुळे या परिसरातील नगर पालिकेचे माजी नगरसेवक व मातंग समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै मच्छीन्द्र यांचे नाव या रस्त्याला देण्यात यावे व शेतकरी बोर्डिंग व माळी बोर्डिंग जवळ असलेल्या चौकास त्यांचे नाव देऊन तसे नामकरण करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्षअँड. नितीन पोळ यांनी केले आहे
