
कोपरगाव प्रतिनिधी:-
पद्मविभूषण आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने एस.एस.जी.एम. महाविद्यालय व महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथील कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरला १३ ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन देण्यात आले.

कारखान्याच्या माध्यमातुन कोविड केअर सेंटरला आणखी ५ ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन लवकरच देण्यात येणार असून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, तालुका आरोग्य अधिकारी संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक अजीज शेख, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, रमेश गवळी, कृष्णा आढाव, नारायण लांडगे, विशाल निकम, डॉ. दीपक पगारे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. भाग्यश्री घायतडकर, डॉ. राजेंद्र रोकडे, डॉ. अभिजित आचार्य, डॉ. रवींद्र शेळके, शेखर झगडे आदी उपस्थित होते.
