
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटबंना कानडी दडपशाहीचा कोपरगाव शिवसेना शिव वाहतुक सेनेच्या वतिने निषेध..!!
कोपरगाव प्रतिनिधी:- कर्नाटक बंगळरु येथे देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटबंना शनिवारी झाली असुन या घटनेचा देशभरातुन निषेध होत आहे.या प्रकरणात कर्नाटक सरकार कडुन दडपशाही करण्यात येत आहे.या दडपशाहीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटबंना करणार्या कानडी प्रवृत्तींचा निषेध व्यक्त करण्यात आला.आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटबंना कानडी दडपशाहीचा कोपरगाव शिवसेना शिव वाहतुक सेनेच्या वतिने मंगळवारी दि २१ रोजी कोपरगाव येवला रोडवरील अंचलगाव टोलनाक्यावर शिवसेना व महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोदवत कर्नाटकातील वाहनांना अडवुन या वाहनावर निषेधाचे स्टिकर चिटकुन तिव्र शब्दात निषेध नोदविला आहे.कोपरगाव शहरातील शिव सैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.


या घटनेचा निषेध करतांना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज आमचे प्रेरणास्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांची विटबंना करणार्या विकृत बुद्धीच्या लोकांचा कर्नाटक सरकारने कठोर शासन करावे.अन्यथा शिवसेनेच्या वतिने शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल.यापुढे जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटबंना केली तर अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांचे शिरछेद केल्या शिवाय राहणार नाही.वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष इरफान शेख म्हणाले की,कर्नाटक सरकारने लवकरात लवकर विटबंना करणार्याचा शोध घेवुन कठोर कारवाई करावे.छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत असुन यापुढे असे प्रकार खपवुन घेतले जाणार नाही.आम्ही कर्नाटाकत येवुन या घटनेचा निषेध करुन कर्नाटक शासनाचा विरोध करु.छत्रपती शिवरायांची विटबंना कदापी सहन करणार नाही.कर्नाटक सरकारने अशा घटना होणार नाही याची खबरदारी घ्यावी.आरोपींना कडक शिक्षा करावी जेणे करून असे प्रकार पुन्हा घडणार नाही.या वेळी शिवसेना शिव वाहतुक सेनेसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने एकत्र येत निषेध नोदविला आहे.याप्रसंगी शिव वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष इरफान शेख,शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,विकास शर्मा, वैभव गिते, शिव वाहतुक सेना तालुकाप्रमुख, अविनाश धोक्रट,पप्पु पेकळे,किरण कुर्हे, शिव वाहतूक सेना शहर प्रमुख जाफर सय्यद प्रवीण शेलार,सतिष शिंगाणे, ऋषिकेश पवार दत्तात्रय सालकर गोविंद चव्हाण, मगेश देशमुख,ऊमेश छुगाणी,रवि ठोंबरे,मनोज ताटे,प्रवीण पवार, सनी खंडारे उपस्थित होते.
