पदवी नसलेले इंजिनीयर पण काळाच्या धातूवर कोरलेले कारागीर “दो भाई इंजिनिअरिंग वर्क्स” :- गोरे सर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगावच्या एस.टी. स्टँडसमोर उभं असलेलं
“दो भाई इंजिनिअरिंग वर्क्स
हे फक्त एक दुकान नाही,
तर स्वातंत्र्यानंतर उभ्या राहिलेल्या सहकार क्रांतीचं
लोखंडी साक्षीदार आहे…
रशीदभाई आणि नसीरभाई आत्तार
घरात कुणीही इंजिनीयर नाही,
पण हातात अशी जादू,
की लोखंड सुद्धा त्यांच्या स्पर्शाने शहाणं व्हायचं…
त्या काळात कोपरगाव भरभराटीला येत होतं,
संजीवनी, कोसाका कान्हेगाव, सोमय्या…
कारखान्यांचा गड उभा राहत होता,
आणि त्याच वेळी
या दोघा भावांनी आपल्या कष्टाने
इंजिनिअरिंगचा पाया घट्ट केला…
विहिरीवरील ऑइल इंजिन असो,
उसासाठी लागणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रकचे चेसी आउट काढणे असो,
मोटारचे बेरिंग, हेड, हाऊसिंग असो,
किंवा इंजिनची बारकाईची कामं…
प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट दिसायची
परफेक्शन !
शिक्षण नव्हतं, पदवी नव्हती,
पण अनुभव हा त्यांचा गुरू होता…
आणि प्रामाणिकपणा हीच त्यांची ओळख…
आज परिस्थिती बदलली,
तंत्रज्ञान बदललं,
पण लोकांची गरज आणि विश्वास अजूनही तसाच आहे…
आणि म्हणूनच
आजचा आधुनिक इंजिनिअरिंगही
त्यांच्या कामासमोर कधी कधी फिका पडतो…
आज ही परंपरा पुढे नेत आहेत
अरिफभाई आणि जमीलभाई
त्यांच्या हातातही तीच अचूकता,
तीच कामावरील निष्ठा…
पंप रिपेअरिंग, रोटर कटिंग,
लेथ मशीनवरील सूक्ष्म कामं,
कॅलिपरच्या पिनला ओ-रिंग बसवणं…
हे सगळं करताना
ते केवळ मशीन दुरुस्त करत नाहीत,
तर विश्वासाची परंपरा जिवंत ठेवतात…
ना पदवी, ना मोठी शाळा,
तरीही कामात ज्ञानाची कमाल जाळा…
घामाच्या थेंबातून घडवलं स्वप्न,
लोखंडातही त्यांनी पाहिलं जीवन…
हातात साधनं, मनात ईमान,
प्रत्येक कामात दिसे अल्लाची मेहरबान…
“अल्ला की मेहरबानी है…” म्हणत ते हसतात,
आणि प्रत्येक दुरुस्तीतून आयुष्य घडवत जातात…
ही केवळ दोन भावांची कहाणी नाही…
ही आहे त्या प्रत्येक कष्टकरी हाताची गोष्ट,
ज्यांनी पदवीपेक्षा प्रामाणिकपणाला मोठं मानलं…
“दो भाई इंजिनिअरिंग वर्क्स
कोपरगावच्या इतिहासातलं
एक जिवंत, प्रेरणादायी, आणि अभिमानास्पद पान…

गोरे सर
कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *