कोपरगाव तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नम्र आवाहन / विनंती:- तहसीलदार विजय बोरुडे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नम्र
आवाहन/ विनंती…
सप्टेंबर महिन्यात दोन वेळा अतिवृष्टी आणि सर्वदूर संततधार पावसामुळे बहुतेक सर्व पिके आत्ताही पाण्याखाली आहेत..

तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक हे संयुक्त पंचनामे करत आहेत..
आपल्या शेतातील नुकसान झालेले फोटो काढून ठेवा.. आपले बँक अकाउंट तसेच IFSC नंबर त्यांना तत्काळ द्या..
तलाठी ग्रामसेवक व कृषी सहायक यांना नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्या करिता व बँक अकाउंट डिटेल्स गोळा करण्या करिता सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी सहकार्य केल्यास लवकरात लवकर आपण शासनाला नुकसानीची अंतिम आकडेवारी देऊ शकू..
गावातील दक्षता समिती .. तंटामुक्ती समिती चे सर्व सदस्य यांनी या कामी तलाठी ग्राम सेवक यांचेकडे नुकसान ग्रस्त शेतकरी यांची यादी बँक अकाउंट डिटेल्स सह दिल्यास पंचनामे लवकर होतील..

आज शेतकरी अतिशय हतबल झालेला आहे.. आपण सर्वांनी मिळून सहकार्य केल्यास शासनाकडे अनुदान मागणी लवकर करता येईल..
कृपया ज्यांचे नुकसान झाले नसेल अशा व्यक्ती चा यादी मध्ये समावेश चुकून ही करू नका..
जय किसान.. चला शेतकऱ्यासाठी पुढील एक आठवडा देऊ यात..
आपल्या गावातील शेतकऱ्यांचा data base देखील प्रशासन या निमित्ताने तयार करणार आहे… त्यामुळे पुढील काळात अशी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास तत्काळ मदत पुरवता येईल .
तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक यांनी कार्यकर्ते यांचे कडून याद्या घ्याव्यात..
गावचा डाटा base तयार करावा ..
आणि ज्यांचे नुकसान झाले आहे अशा व्यक्तींची यादी संयुक्त पंचनामा सह जमेल तितक्या लवकर सादर करावी..
तहसीलदार कोपरगाव..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *