
कोपरगाव प्रतिनीधी:-
लसीकरण करण्यासाठी होणारी गर्दी व नागरिकांची होणारी हाल टाळण्यासाठी नगर पालिकेने घरोघरी जाऊन लसीकरण नोंदणी करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की मागील तीन ते चार महिन्या पासून करोना लसीकरण सुरू आहे मात्र लसीची अपुरा पुरवठा, आरोग्य अधिकारी यांचे ठिसाळ नियोजन यामुळे साधारण एक लाख लोक संख्या असलेल्या शहरात आता पर्यंत फक्त तीस हजार नागरिकांचे लसीकरण झाले लस उपलब्ध झाल्याने गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालयात नाव नोंदणी, टोकन घेण्या साठी व लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली
शासनाच्या निर्णय नुसार लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते तसेच नोंदणी केल्या नंतर पुन्हा ऑनलाईन पद्धतीने वेळ बुक करावी लागते मात्र अनेक गोरगरीब नागरिकांकडे अँड्रॉईड मोबाईल नाही त्यामुळे त्यांना लसीकरण नोंदणी व त्याबाबतची काही माहिती नाही त्यामुळे गोरगरीब नागरिक लसीकरण करण्यापासून वंचित राहत असून विनाकारण साथीच्या आजाराचे बळी पडत आहेत
नगर पालिकेने मागील वर्षी व या वर्षी देखील घरोघरी जाऊन शहरातील नागरिकांचा साथीच्या आजाराबाबत सर्व्हे केलेला आहे त्याची माहिती नगर पालिका व आरोग्य विभाग यांच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे नगर पालिकेने घरोघरी जाऊन किंवा प्रत्येक प्रभागातील नगर सेवकांच्या मदतीने लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांना लसीकरणाची नोंदणी व लसीकरण वेळ निश्चित करता येईल तसेच नागरिकांना देखील आपला लसीकरण नंबर कधी आहे याची माहिती मिळेल व लसीकरण नोंदणी करण्यासाठी, टोकन मिळवण्यासाठी आरोग्य केंद्रात होणारी गर्दी रोखता येईल त्यामुळे नगरपालिकेने स्थानिक नगर सेवक यांच्या मदतीने प्रत्येक वॉर्डमध्ये लस नोंदणी साठी कक्ष उभे करावे व गोरगरीब जनतेला व नागरिकांना दिलासा द्यावा असे या पत्रकात म्हटले आहे
