
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या रस्त्यांना ना. आशुतोष काळेंच्या निधीतून मुहूर्त लागला असून मागील काही वर्षापासून या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या अडचणी दूर करण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी प्रमोद रोहमारे घर ते डोखे घर या रस्त्यासाठी २४ लाख व प्रजीमा ९८ मधुकर औताडे घर ते वैताग मळा डी.पी. (डोऱ्हाळे रस्ता) या रस्त्यासाठी २० लाख रुपये निधी दिला आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
मतदार संघातील बहुतांशी गावांनी विधानसभा निवडणुकीत मतांची निर्णायक आघाडी दिल्यामुळे विजयश्री प्राप्त झाली यामध्ये पोहेगाव गटातील अनेक गावांचा देखील समावेश आहे. सुजाण मतदारांनी दिलेल्या आशीर्वादातून उतराई होण्यासाठी इतर गावांप्रमाणे पोहेगाव गटातील गावांना देखील मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी दिला असून भविष्यकाळात देखील अनेक मोठी विकासकामे सुरु होणार असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी ना. आशुतोष काळे यांना ‘राज्यमंत्री दर्जा’ मिळाल्याबद्दल व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेस – पोहेगाव रस्त्याचे काम मार्गी लावल्याबद्दल मयुरेश्वर इंग्लिश मेडिअम स्कुलचे संस्थापक विलास साळुंके यांनी ना. आशुतोष काळे यांचा सत्कार केला.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे, प्रविण शिंदे, राहुल रोहमारे, मधुकर औताडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, योगीराज देशमुख, कृष्णा शिलेदार, राहुल जगधने, एम.टी. रोहमारे, संजय रोहमारे, देवेन रोहमारे, जयंतराव रोहमारे, नंदकिशोर औताडे, राजेंद्र औताडे, वसंतराव पाचोरे, राजेंद्र पाचोरे, सूर्यभान पाचोरे, ज्ञानेश्वर गव्हाणे, विजय काटकर, योगेश औताडे, गंगाराम औताडे, अमोल आभाळे, नितीन शिंदे, सुधाकर औताडे, किशोर शिंदे, सतिष पवार, सिध्दार्थ शिंदे, गणेश औताडे, विलास साळुंके, लक्ष्मण थोरात, सुनील रोहमारे, नरहरी रोहमारे, साईनाथ आवारे, राजेंद्र रोहमारे, उपकार्यकरी अभियंता प्रशांत वाकचौरे, अभियंता उत्तमराव पवार, बाळासाहेब जपे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


फोटो ओळ:– पोहेगाव येथे रस्त्याच्या मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे.
