
कोपरगाव प्रतिनिधी:-
दरवर्षीप्रमाणे लायन्स , लीनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट च्या रात्री ‘ एक शाम देश के नाम ‘ हा उपक्रम घेत आहे
हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ होणार असून या कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर विविध नृत्य ,गीत, नाट्य , अतिशबाजी तसेच माजी सैनिकांचा व त्यांच्या परिवाराचा सन्मान होणार आहे
या सांस्कृतिक उपक्रमात इंडियन आयडॉल ( मराठी )विजेते कु गौरी पगारे व कु. सुरभी कुलकर्णी हे उपस्थित राहून देशभक्तीपर गायन सादर करणार आहेत
कार्यक्रमानंतर भव्य अशी मशाल फेरीचे आयोजन केले आहे कोपरगावातील नागरिक या देशभक्तीपर कार्यक्रमात सहभागी होऊन देशभक्तीची भावना व्यक्त करीत असतात
‘ ऑपरेशन सिंदूर ‘ नंतर प्रथमच कोपरगाव मधे असा देशभक्तीपर कार्यक्रम होत असल्यामुळे सर्व देशभक्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन लायन्स ,लिओ, लीनेस क्लब ,कोपरगाव तर्फे करण्यात आला आहे
