
कोपरगाव प्रतिनिधी:-
श्री.विवेक भैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानने “एक राखी जवानांसाठी” या उपक्रमा करिता एक रथ तयार करून पूर्ण भारतात फिरवला, त्यामुळे जवानां प्रती आदर व अभिमान वाढू लागला.
रक्षाबंधन हा सण बहिण भावाच्या पवित्र नात्याचा असतो. सर्व देशातील रक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या सैनिकांसाठी हा एक राखी जवानांसाठी हा उपक्रम राबविला गेला.
सीमेवर रक्षण करताना आपल्या बहिणीकडे न आल्यामुळे मनात एक प्रकारची खदखद होती. नेमकी हीच बाब श्री.विवेक भैय्या कोल्हे यांनी हेरली…….यातूनच एक राखी
जवानांसाठी ही संकल्पना पुढे आली. 7 राज्य…….25 मोठी शहरे यात हा राखी रथ फिरवण्यात आला त्यात अनेक भावनिक प्रसंग आले, भगिनींच्या डोळ्यात अक्षरशा अश्रू आले. कोणीतरी आपली आठवण करणारे आहे या भावनेने भारतीय जवान गहिवरून गेले सीमेवर ऑपरेशन सुरू असतानाही भीतीचे वातावरण असतानाही संजीवनी प्रतिष्ठानचे धडाडीचे युवकांनी सीमेवर जाऊन हा उपक्रम राबविला.
राजकारण व राजकीय पक्ष यांच्या पलीकडे जाऊन एक राखी जवानांसाठी हा संकल्प दरवर्षी मोठा होत जाऊन त्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. पुढे जाऊन काही जवानांच्या घरी जाऊन त्याच्या भगिनीकडून राख्या गोळ्या करण्याचा मानस आहे.
भारतात कोणतीही देशभक्ती व सामाजिक ऐक्याचे नाव निघाल्यास कोपरगाव चे नाव प्रथम येईल असा विश्वास युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. संजीवनी प्रतिष्ठानच्या या देश सेवेला सलाम
मुश्किले हे जरूर,
मगर ठहरे नही है हम,
मंजिलो से कह दो ….
अभी पहुचे नही है हम ॥
नारायण शेठ अग्रवाल कोपरगाव.
मो.9822630330
