

कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्म येथील कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, समाधान जेजुरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, युवती जिल्हाध्यक्ष किशोरी खैरनार, समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, महिला शहराध्यक्ष आशा भंदुरे, शहर पदाधिकारी नाना सोमवंशी, बाळासाहेब गीते, नाना पवार, ऍड.प्रतीक कर्डक, रवींद्र शिंदे,सागर मोटकरी, सुनील पैठणकर, पुष्पा राठोड, दुर्गेश चित्तोडे, ज्ञानेश्वर साबळे, कृष्णा गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
