
कोपरगाव प्रतिनिधी:- महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती एस. एस. जी. एम. महाविद्यालयात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी बिरसा मुंडांच्या प्रतिमेचे करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेलया कार्यक्रमात प्रमुख वक्ते इतिहास विभागातील प्रा. किरण पवार यांनी आद्य कांतिकारक राघोजी भांगरे, उमाजी नाईक यांच्यापासून તે बिरसा मुंडा पर्यंतचा इतिहास उलगडून दाखविला. बिरसा मुंडांच्या कार्याचा परिचय देऊन, त्यांनी प्रस्थापितांच्या वर्चखाखाली बहुजनांचा इतिहास दडपला गेल्याची भावना व्यक्त केली. हा दडपला गेलेला इतिहास बहुजनांच्या अभ्यासातूनच जगापुढे आला. त्यामुळे बहुजनांनी लिहिते होण्याची गरज आहे त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे
प्र. प्राचार्य डॉ. रमेश सानप हे होते .अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी, कवी काव्यविहारी यांच्या काव्यपंक्ती सादर करत स्वातंत्र्याच्या ध्येयाने वेडे झालेल्यांच्या योगदानामुळेच आज आपल्याला स्वातंत्र्य उपभोगायला मिळत आहे, यांची जाणीव करून दिली. तसेच हा प्रेरणादायी इतिहास आपण समजून घ्यावा, इतिहास लेखनाचे महत्त्व जाणावे आणि त्यातून आपण शिकत असलेल्या संस्थेचा, रहिवासी गावाचा इतिहास लिहावा ,असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. बाबासाहेब शेंडगे, उपप्राचार्य डाॅ. सुभाष रणधीर यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शेंडगे यांनी तर सूत्रसंचालन डॉक्टर वैशाली सुपेकर यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा. सुनिल काकडे यांनी मानले.
