कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाच्या व्हाॅलीबाॅल (मुले) संघाने शिवलिंगेश्वर काॅलेज ऑफ फार्मसी, अलमाला, ता. औसा, जि. लातुर या महाविद्यालयाने घेतलेल्या राज्यस्तरीय व्हालीबाॅल स्पर्धेत पहिल्या चार संघात स्थान पटकावुन क्रिडा क्षेत्रातही आपला दबदबा कायम ठेवला, अशी माहिती संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयांच्या वतीने पसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की या स्पर्धेत राज्यातील विविध बी. फार्मसी महाविद्यालयांमधुन एकुण ४८ संघांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये आयोजक महाविद्यालयाने शिस्तबध्दरित्या उत्कृष्ट खेळ करणारे चार संघ निवडले, त्यात संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाच्या संघाचा समावेश आहे. यामुळे संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाचा नावलौकिक दर्जा व गुणवत्तापुर्वक शिक्षणा बरोबर क्रीडा क्षेत्रातही पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाच्या संघात खेळाडू यश महेश गोसावी (कर्णधार), ओम संजय सोनवणे, जयेश राहुल आढाव, अखिलेश किशोर ठोंबरे, प्रतिक कैलास पवार, प्रणव सचिन कोते, ज्ञानेश महेश काशीद, साईराज संजय तुरकणे, सोमनाथ रामराव अव्हाड व ओम श्रीशैल्यासोमनाथ शिराळ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या खेळाडूंना प्रा. अगस्ती वारे व क्रीडा संचालक शिवराज पाळणे यांचे मार्गदर्शन लाभले.
संजीवनी गु्रप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी या सर्व खेळाडूंचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी बी. फार्मसी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. विपुल पटेल, प्रा. वारे व प्रा. पाळणे उपस्थित होते. तसेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनीही सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

फोटो ओळीः-संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी यांचे समवेत राज्यस्तरीय व्हालीबाॅल स्पर्धेत पहिल्या चार संघात स्थान मिळविणारा संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाचा संघ. यावेळी डाॅ. पटेल, प्रा. वारे व प्रा. पाळणे उपस्थित होते.
