

कोपरगाव प्रतिनिधी:-
राजमाता जिजाऊंचे वडील लखोजीराजे जाधव यांचे १६ वे वंशज श्री.शिवाजीराजे जाधव (सिंदखेड-राजा) यांनी कोपरगांव येथील माजी सैनिक कै. आप्पा घोडके यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीपराव घोडके,महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांची सदिच्छा भेट घेतली.
या प्रसंगी त्यांचे समवेत शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित शेषनारायण लोंढे,नायब तहसिलदार संजय ईसाळकर उपस्थित होते.
घोडके परिवाराच्या वतीने ज्येष्ठ प्रकाश घोडके, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके,जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी सोसायटीचे माजी संचालक व योग शिक्षक संतोष नलगे, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार व स्वच्छतादूत सुशांत घोडके,सुरेश घोडके,क्रीडा शिक्षक शिवप्रसाद घोडके,तन्मय घोडके यांनी त्यांचे फेटा, शाॅल,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
तळागाळातील लोकांना सोबत घेऊन कला, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात घोडके परिवाराचे कार्य कौतुकास्पद आहे. छत्रपती शिवाजीराजे यांच्या नावाने दिले जाणारे क्रीडा आणि पर्यावरणाचे क्षेत्रात कार्य केल्याचे सन्मान एकाच कुटुंबात येणे हे दुर्मिळ उदाहरण असल्याचे श्री.शिवाजीराजे जाधव यांनी सांगितले.
याप्रसंगी उपस्थित माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,राजेंद्र झावरे,मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,शिवसेना संपर्कप्रमुख मनोज कपोते,किरण खर्डे, माजी सैनिक संघटनेचे भाऊसाहेब निंबाळकर,प्रसिध्द व्यापारी जितेंद्र लोढा,एम.के.आढाव विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वानखेडे,अनिल वायखिंडे, शिक्षण मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना निंबाळकर,अशोक निकम,दत्तात्रेय कांबळे,कलाशिक्षक अतुल कोताडे,शिवजयंती उत्सव समितीचे मकरंद जोशी,स्वप्नील काळे, वैभव जोशी,किशोर सोनवणे,पंडीत वक्ते शिवप्रेमींनी श्रीमान शिवाजीराजे जाधव यांचा स्वागत सन्मान केला.
