
कोपरगाव प्रतिनिधी:-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तरनगर सह संपर्कप्रमुख व माजी नगराध्यक्ष मा.श्री.राजेंद्रजी झावरे यांच्या वाढदिवसा निमित्त कोपरगाव शिवसेना,युवासेना,शिव आरोग्य सेना,सर्व शिवसेनेचे अंगीकृत संघटना व मृत्युंजय तरुण मंडळ यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर कोपरगावकरांसाठी रविवार दिनांक २५ फेब्रुवारी,२०२४ रोजी व्यापारी धर्मशाळा कोपरगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन,मधुमेह,ई.सी.जी,रक्तदाब,वजन व तसेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी कोपरगावातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगाव युवासेनेचे शहर प्रमुख शेखर कोलते यांनी केले आहे.
