गोदावरी दूध संघातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत बूस्टर डोसचा कार्यक्रम:-राजेशजी परजणे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
कोरोना प्रतिबंधक लशींच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रेनंतर केंद्र सरकारने सुमारे ७५ दिवस वर्धक मात्रा ( बुस्टर डोस) मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला असून त्या पार्श्वभूमीवर गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघातील कर्मचाऱ्यांसाठी बुस्टर डोसचा लसिकरण कार्यक्रम राबविण्यात आला. पहिल्याच दिवशी सुमारे ३०० डोसचे लसिकरण झाले.
शिंगणापूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत कोविड लसिकरणाचा हा कार्यक्रम राबविला जात असून या कार्यक्रमाचे उ‌द्घाटन संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांच्याहस्ते व कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनिकेत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णाजी पवार, आरोग्यसेविका श्रीमती वंदना धनवटे, श्रीमती व्ही. ए. लोखंडे, श्रीमती वैशाली उंडे, श्रीमती मलका आजगे, श्रीमती नीता भोसले यांनी लसिकरणाचे नियोजन केले.
आपला देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करीत आहे. या अमृत महोत्सवानिमित्त १८ वर्षावरील सर्वच नागरीकांना मोफत वर्धक मात्रा (बुस्टर डोस) मोफत उपलब्ध करुन देण्याचा महत्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली व दुसरी मात्रा याआधी सर्वांनाच मोफत दिलेल्या आहेत. त्यानंतर बुस्टर डोसचा पर्याय खाजगी रुग्णालयामध्ये सशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेला होता. परंतु आता अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दि. १५ जुलै २०२२ पासून पुढील ७५ दिवस हा कार्यक्रम मोफत राबविला जाणार असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या या उपक्रमामुळे जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या लसिकरणाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *