लोणी काळभोर तुमच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे ; राष्ट्रीय अधिवेशनासाठी तुम्ही येत आहात ना…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.२० व २१ ऑगस्ट २०२२ रोजी लोणी काळभोर (पुणे)येथे होणारे यंदाचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राज्यभरातील पत्रकार हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावेत यासाठी आमच्यासह सर्व जिल्हा, तालुका संघाच्या पदाधिकार्यांनी अधिकाधिक सभासदांना संपर्क करू या.
नांदेड येथील मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी परिषदेचे पदाधिकारी,जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि विशेषतः यजमान पद स्विकारलेल्या नांदेड जि.म.प.संघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतल्यामुळे न भूतो न भविष्यति असं अधिवेशन पार पडलं.पत्रकारांची उपस्थिती पाहून अधिवेशनाचे उदघाटक सन्मा.ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ व मुंबईसह राज्यातून अधिवेशनाला प्रथमच आलेल्या पत्रकारितेतील मान्यवरांनी प्रशंसा केली. आणि याची दखल उपस्थित असलेल्या राजकीय मंडळीनी सुध्दा घेतली. आपण संघटित असल्याची आपणास मिळालेली ही पोच पावती होती. मी परिषदेच्या ग्रुपमध्ये मुख्य विश्वस्त ते कार्यकारिणी सदस्य यांच्या मोबाईल क्रमांकासहीत यादी पाठविली आहे. प्रत्येक उपाध्यक्षाने आपल्या विभागातील आपल्या विभागांतर्गत येणार्या विभागीय सचिवांशी संपर्क साधावा.तसेच विभागीय सचिवांनी जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी यांना मोबाईलवर संपर्क साधून राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आवाहन करावे.जे पदाधिकारी संपर्क साधणार त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातून किती सभासद येणार आहेत त्यांची नावासहित यादी मागवून घ्यावी व त्याची लेखी नोंद ठेवावी.तसेच जिल्हा व तालुकाध्यक्ष व सरचिटणीस यांचे मोबाईल नंबर आपल्या नोंद वहीत लिहून ठेवावे.
जेणे करून तुम्हाला व परिषदेच्या पदाधिकार्यांना संपर्क करणं सोयीचे होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *