

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतीय जनता पार्टी(वसंत स्मृती कार्यालय) च्या वतीने पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्याचबरोबर राष्ट्रपिता म.गांधीजी व स्व.लाल बहाद्दूर शास्त्रीजी यांचे जयंती निमित्त कोपरगाव शहरातील धाडसी युवक-सध्या सेनादलात कार्यरत असलेले शूरवीर जवान
सुलतान सय्यद यांचा व त्यांच्या माता पित्यांचा सन्मान
त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला.यावेळी श्री.विजय वहाडणे, विनायक गायकवाड,प्रभाकर वाणी,विजय बडजाते, विनीत वाडेकर,संजय कानडे,संजय कांबळे,नंदकुमार जोशी,सुरेश कांगोने, किरण थोरात,रविंद्र बागरेचा,वसंत जाधव,योगेश वाणी, मन्नू कृष्णानी,सादिक शेख,विजय जोशी,प्रकाश सवाई
इ.कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री.विजय वहाडणे यांनी कोपरगावचा भूमिपुत्र शूरवीर सुलतान सय्यद सीमेच्या रक्षणासाठी रात्रंदिवस निधडया छातीने उभा आहे.कुठल्याही नगराध्यक्ष-आमदार-
खासदार,नामदार यांच्यापेक्षा सीमेवर उभा असलेला सुलतान हाच सर्वांचा खरा हिरो आहे असे म्हणावे लागेल.समाजसेवक श्री.संजयजी काळे,आदिनाथ ढाकणे इ.निःस्वार्थ समाजसेवकांप्रमाणेच सुलतान ची निरपेक्ष सेवा हा आपल्या कोपरगावची शान आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी श्री.संजय कांबळे यांनी प्रास्ताविक तर श्री.विनायक गायकवाड यांनी आभारप्रदर्शन केले.
