के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा….
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित कोपरगाव येथील के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा निकाल उत्कृष्ट लागला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२२ मध्ये घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेटवर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.
१२ वी विज्ञान शाखा – खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१) कडलक निशांत सुनिल एकूण गुण ५१३ एकूण टक्के – ८५.५० %
२) बारगळ रोहित किसनराव एकूण गुण ५०१ एकूण टक्के – ८३. ५० %
३) खारोटे अमित बाबासाहेब एकूण गुण ४९५ एकूण टक्के – ८२. ५०%
१२ वी वाणिज्य शाखा – खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१) मगर वैष्णवी अंबादास एकूण गुण ५१९ एकूण टक्के – ८६.५०%
२) जोशी अंशू मोहन एकूण गुण ४९९ एकूण टक्के – ८३. १७%
३) कु. पाडियार पायल तुलसीदास एकूण गुण ४९२ एकूण टक्के – ८२. ००%
४) कु. गाडे मयुरी दादासाहेब एकूण गुण ४९२ एकूण टक्के – ८२. ००%

१२ वी कला शाखा – खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१) कु. पंडोरे श्रद्धा प्रकाश एकूण गुण ४२० एकूण टक्के – ७०. ००%
२) कु. चव्हाण लीना गोरख एकूण गुण ४०८ एकूण टक्के – ६८. ००%
३) कु. कुंडारे दिशा नेमीनाथ एकूण गुण ४०७ एकूण टक्के – ६७. ८३%
महाविद्यालयाचा एकूण कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेचा मिळून निकाल ८०. ७३%
यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे, उपाध्यक्ष , श्री. रामदास भिमाजी होन, सचिव ऍड. संजीव कुलकर्णी, श्री. संदीप रोहमारे, सर्व सदस्य व प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सोनवणे बी. आर., रजिस्ट्रार डॉ. नाईकवाडे ए. सी. यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेश प्रकिया सुरु झाली असून महाविद्यालयाचे पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट करियर ओरिएंटेड अभ्यासक्रम बी.बी ए._सीए., बी. सी.एस. , बी. एस. सी. (सूक्ष्म जीवशास्त्र) हे चालू आहेत. प्रवेश क्षमता मर्यादित असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन त्वरित प्रवेश घ्यावा असे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *